rohit shrma and virat kohli  saam tv
Sports

Team India Captain: रोहितची कर्णधार पदावरुन हकालपट्टी तर विराट होणार पुढील कर्णधार? इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेला उधाण..

Virat Kohli Instagram Story: विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Captaincy: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडू विश्रांती घेताना दिसुन येत आहेत.

विराट कोहली देखील मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसुन येत आहे. नुकताच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामुळे विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

रोहितची बत्ती गुल तर विराट पुन्हा होणार कर्णधार?

विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यात तो बदलांबद्दल बोलताना दिसुन येत आहे. विराटची स्टोरी व्हायरल होताच नेटकऱ्यांनी असा अंदाज लावायला सुरूवात केली आहे की, रोहितची हकालपट्टी होऊन विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधार होऊ शकतो.

कर्णधार म्हणुन रोहित शर्मा ठरतोय फ्लॉप?

रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नावे आयपीएलच्या ५ ट्रॉफी जिंकण्याची नोंद आहे. मात्र भारतीय संघाचे नेतृत्व करताना तो आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकुन देऊ शकला नाही.

भारतीय संघाला २०२२ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याची संधी मिळाली होती. मात्र ही संधी देखील भारतीय संघाने गमावली होती. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Latest sports updates)

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया..

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि वक्ते अॅलन विल्सन वॉट्स यांचा एक कोट शेअर केला आहे. परिवर्तनातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग ते स्वीकारणे, त्यासोबत पुढे जाणे आणि त्याचा आनंद घेणे, असा या कोटचा अर्थ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

SCROLL FOR NEXT