IPL 2024 Virat Kohli  
Sports

RR Vs RCB: IPLमध्ये इतिहास घडणार; राजस्थान रॉयल्सविरुद्ध RCBच्या सामन्यात कोहलीच्या खेळीवर सर्वांचं लक्ष

IPL 2024 Virat Kohli : आयपीएल २०२४ मधील १९ वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्समध्ये होणार आहे. या सामन्यात विराटकडे अनोखा विक्रम करण्याची संधी आहे.

Bharat Jadhav

RR vs RCB Virat Kohli Record In IPl:

आयपीएल २०२४ मधील १९ वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची भिडत राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. हा सामना सवाई मानसिंह स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यादरम्यान विराट कोहली एक विक्रम करेल. या विक्रम करण्यासाठी विराट कोहलीला फक्त ३४ धावांची आवश्यकता आहे. (Latest News)

काय आहे विक्रम

विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २४१ सामने खेळले आहेत. या दरम्यान २३३ डावांमध्ये त्याने ३७.७ च्या सरासरी आणि १३०.२९ च्या स्ट्राइक रेटने ७४६६ धावा केल्यात. या स्पर्धेत विराट कोहलीने ५२ अर्धशतके आणि ७ शतकं केली आहेत. तर आयपीएलच्या इतिहासात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. जर आज विराट कोहली ३४ धावा काढेल तर तो आयपीएलमध्ये ७५०० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरेल. आयपीएलमध्ये इतक्या मोठ्या धावा करणारा फलंदाज म्हणून तो पहिला क्रिकेटर असेल.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • विराट कोहली - ७४६६ धावा

  • शिखर धवन - ६७५५

  • डेविड वॉर्नर - ६५४५

  • रोहित शर्मा - ६२८०

  • सुरेश रैना - ५५२८

आयपीएलमध्ये कोहलीचं विराट प्रदर्शन

आयपीएल २०२४ मध्ये विराट कोहलीच्या आतापर्यंतची कामगिरी ही विराट राहिलीय. त्याने ४ सामन्यात ६७.६७ च्या सरासरीने आणि १४०.९७ च्या स्ट्राइक रेटने २०३ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने यंदाच्या सत्रात आतापर्यंत २ अर्धशतके झळकावली आहेत.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोहलीने २० चेंडूत २१ धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराटने ४९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. किंग कोहलीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ५९ चेंडूत ८३ धावांची नाबाद खेळी खेळली. तसेच मागील सामन्यात विराटने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध २२ धावा केल्या होत्या.

मैदानात उतरताच मोठ्या रेकॉर्डची नोंद

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्समध्ये झाला. या सामन्यात विराट कोहली मैदानात उतरताच त्याच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. विराट कोहली आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व करतोय.या संघासाठी त्याने आतापर्यंत २४१ सामने खेळले आहेत. दरम्यान लखनऊ सुपरजायट्ंस संघाविरुद्ध सुरु असलेला सामना हा त्याचा एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील १०० वा सामना होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT