virat kohli breaks the record of taking most catches in world cup by indian player become number by surpassing anil kumble india vs australia twitter
क्रीडा

Virat Kohli Record: मार्शची कॅच पकडताच किंग कोहलीने रचला इतिहास! या बाबतीत कपिल पाजी अन् सचिनलाही सोडलं मागे

India vs Australia, World Cup 2023: या सामन्यात विराट कोहलीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

Most Catches In World Cup By Indian:

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. मिचेल मार्श स्वस्तात माघारी परतला. दरम्यान मिचेल मार्शचा झेल टिपताच विराट कोहलीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना तिसरं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या मिचेल मार्शला खातं ही उघडता आलं नव्हतं.

बुमराहने हार्ड लेंथवर टाकलेला चेंडू टप्पा पडताच आत आला आणि मिचेल मार्शच्या बॅटचा कडा घेऊन गेला. स्लिपमध्ये असलेल्या विराट कोहलीने डाइव्ह मारच भन्नाट झेल टीपला.

हा त्याचा वर्ल्डकप स्पर्धेतील १५ वा झेल ठरला आहे. यासह वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक झेल टिपण्याच्या बाबतीत त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

या झेलसह तो वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक झेल टिपणारा भारतीय क्षेत्ररक्षक ठरला आहे. विराटने वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत १५ झेल टिपले आहेत. तर अनिल कुंबळे यांनी वर्ल्डकप स्पर्धेत १४ झेल टिपले होते.

या यादीत माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव तिसऱ्या स्थानी आहे. कपिल देव यांनी १२ झेल टिपले होते. तर सचिन तेंडूलकरच्या नावे देखील १२ झेल टिपण्याची नोंद आहे. (Latest sports updates)

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक झेल टिपणारे भारतीय खेळाडू (क्षेत्ररक्षण)

१५ - विराट कोहली*

१४- अनिल कुंबळे

१२ - कपिल देव

१२- सचिन तेंडूलकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT