virat kohli and jonny bairstow  saam tv
Sports

'तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर', विराट कोहली जॉनी बेयरस्टोशी भिडला

इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरेस्टो आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक चकमक झाली, त्यानंतर...

नरेश शेंडे

एजबॅस्टन : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबेस्टनमध्ये (India vs England Test) रोमांचक टेस्ट सुरु आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत भारताच्या फलंदाजांनी चकमदार कामगिरी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मात्र, तिसऱ्या दिवशी मैदानात वेगळाच रोमांच पाहायला मिळाला. फलंदाजीत आक्रमक असणारा भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat Kohli) मैदानावरही आक्रमक भूमिका घेत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्टमध्येही कोहली आक्रमक झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आज तिसऱ्या दिवशी मैदानात सामना सुरु असताना इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरेस्टो आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

विराट कोहली इंग्लंडचा फलंदाज बेयरोस्टोला भिडल्याने अंपायरला त्यांच्या भांडणात हस्तक्षेप करावा लागला. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर इंग्लंडचे जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि बेन स्टोक क्रिजवर आले. त्यानंतर गोलंदाजी करायला मोहम्मद शमी मैदानात उतरला. यावेळी शमीने फेकलेला चेंडू बेयरस्टोला खेळता आला नाही. त्यानंतर कोहली आणि बेयरस्टो यांच्यात वादाला सुरुवात झाली.

'तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर'

मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना जॉनी बेयरस्टोने एक चेंडू मिस केला. त्यानंतर स्लिपमध्ये उभा असलेल्या विराट कोहली बेयरोस्टोला काहीतरी बोलला. त्यानंतर बेयरोस्टोनंही विराटला प्रतुत्यर दिलं. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि शाब्दिक चकमक झाली. या दोघांमध्ये झालेलं संभाषण माईकमध्ये कैद झालं. मला सांगू नको,काय करायचं ते.तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर, असं विराटने बेयरोस्टोला सुनावलं.

विराट कोहली आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात झालेला वाद मिटवण्यासाठी अंपायरला हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही अंपायर्सने दोघांनाही शांत राहण्यासाठी सांगितलं. त्यानंतर मैदानात तापलेलं वातावरण थंड होताना दिसलं. जेव्हा मोहम्मद शमीचं षटक संपलं, त्यावेळी विराट आणि बेयरस्टो यांच्यात पुन्हा संभाषण झालं. तेव्हा दोघंही हसताना दिसले.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत ४१६ धावा कुटल्या. रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाने चमकदार कामगिरी केली. पंतने १४६ धावांची शतकी खेळी केली. तसंच जडेजानेही १०४ धावा करुन शतक ठोकलं. त्यानंतर टीम इंडियाने गोलंदाजीतली कमाल केली. अवघ्या ८३ धावांवर भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद केले. भारत या टेस्टे सीरिजमध्ये २-१ ने आघाडीवर आहे. या सीरिजमध्ये भारत जिंकला किंवा टेस्ट ड्रॉ झाली, तरीही सीरिज भारताच्याच नावावर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT