virat kohli six
virat kohli six twitter
क्रीडा | IPL

Virat Kohli Six: केवळ टायमिंग अन् क्लास! किंग कोहलीने जागेवरून खेचला १०३ मीटरचा षटकार, डू प्लेसिसची Reaction व्हायरल - VIDEO

Ankush Dhavre

SRH VS RCB, IPL 2023: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विराट नावाचे वादळ आल्याचे पाहायला मिळाले होते. सनरायझर्स हैदराबाद विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघामध्ये झालेल्या सामन्यात विराटची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली.

त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला. शतकी खेळीदरम्यान त्याने एक क्लासिक षटकार मारला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काही फलंदाजांना षटकार मारण्यासाठी स्टेप आऊट व्हावं लागतं. मात्र विराट कोहली सारखा फलंदाज केवळ टायमिंगच्या जोरावर चेंडू मैदानाबाहेर पाठवू शकतो. सनरायझर्स हैदराबाद विरुध्द झालेल्या सामन्यात त्याने केवळ टायमिंगच्या जोरावर १०३ मीटरचा षटकार मारला.

तर झाले असे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची फलंदाजी सुरू असताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून नीतीश गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने षटकातील पहिलाच चेंडू लेंथ चेंडू टाकला. ज्यावर विराट कोहलीने केवळ आणि केवळ टायमिंगच्या जोरावर जागेवरून १०३ मीटरचा षटकार मारला. हा षटकार पाहून नॉन स्ट्राईकला असलेला फाफ डू प्लेसिस देखील आश्चर्यचकित झाला होता. किंग कोहलीच्या या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. (Latest sports updates)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा जोरदार विजय...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. या महत्वाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून हेनरी क्लासेनने ५१ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने १०४ धावांची खेळी केली.

तर हॅरी ब्रुकने २७ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद १८६ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने ताबडतोब सुरुवात केली. विराटने ६३ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने १०० धावांची खेळी केली.

तर फाफ डू प्लेसिसने ४७ चेंडूंचा सामना करत ७१ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार २ गगनचुंबी षटकार मारले. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girl Child Name: शास्त्रानुसार ठेवा तुमच्या मुलीच नाव, अर्थही जाणून घ्या

PM Narendra Modi in Solapur : स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाहीत, मग मोदींचा प्रश्नच नाही; पंतप्रधानांचा हल्लाबोल

Ravindra Dhangekar On PM Modi: पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला, आचारसंहिता भंग केली; मोदींच्या सभेवर रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाल का? तानाजी सावंतांच्या टीकेवर ओमराजेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

Maharashtra Din 2024 : जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

SCROLL FOR NEXT