viral cricket video  saam tv
Sports

Cricket Funny Video: बॉल ऑफ द सेंच्युरी! घरात खेळत होते क्रिकेट,बॉलऐवजी भावाने स्वतःच उडवली विकेट; पाहा मजेशीर VIDEO

Cricket Viral Video: घरात क्रिकेट खेळत असताना असा काही मजेशीर प्रसंग घडला आहे,

Ankush Dhavre

Funny Moments In Cricket: सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात क्रिकेटच्या व्हिडिओचा देखील समावेश असतो. क्रिकेट खेळत असताना खेळाडूने चांगलं काहीतरी केलं असेल तर त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. मात्र काही मजेशीर व्हिडिओ देखील असतात जे पाहून खदखदून हसल्याशिवाय राहवत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

क्रिकेट हा असा खेळ आहे जो बॅट आणि बॉल असेल तर कुठंही खेळता येऊ शकतो. अनेकांनी मैदानावर न जाता घरातच क्रिकेट खेळण्याचा अनुभव देखील घेतला असेल. दरम्यान घरात क्रिकेट खेळत असताना असा काही मजेशीर प्रसंग घडला आहे, जो कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर अपलोड होताच वेगाने व्हायरल होऊ लागला आहे.

तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक बॅडमिंटन कोर्टमध्ये क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. सर्व काही व्यवस्थित सुरु आहे. फालंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. त्यावेळी गोलंदाज दरवाजाच्या मागून गोलंदाजी करण्यासाठी येतो. गोलंदाज चेंडू टाकतो. मात्र तो फलंदाजापर्यंत पोहचतच नाही. चेंडू पोहचण्यापूर्वी गोलंदाज फलंदाजापर्यंत पोहोचतो. (Latest sports updates)

जेव्हा गोलंदाज चेंडू रिलीझ करतो त्यावेळी त्याचा तोल जातो. तो स्वतःला सावरत सावरत, यष्टीपर्यंत पोहोचतो आणि स्वतःच विकेट घेतो. शेवटी तो यष्टीचा मागेजाऊन पडल्याचे दिसून येत आहे. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

लोणावळा-खंडाळापेक्षा पावसाळ्यात 'या' ठिकाणी होते पर्यटकांची तुफान गर्दी; तुम्हाला माहितीये का हे ठिकाण?

SCROLL FOR NEXT