vinod kambli Health Update | विनोद कांबळीचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ खरा आहे का? काय आहे त्यामागचं सत्य?  SAAM TV
Sports

Vinod Kambli Video: विनोद कांबळीच्या अवस्थेचा तो व्हिडिओ खरा आहे का? वर्गमित्रांनी सांगितलं सत्य!

Vinod Kambli Viral Video Truth: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला धड चालताही येत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण तो व्हिडिओ खरा आहे का? त्याची परिस्थिती खरंच इतकी वाईट आहे का, याबाबत त्याच्या मित्रांनीच खुलासा केला आहे.

Nandkumar Joshi

क्रिकेटच्या मैदानावर एकेकाळी अधिराज्य गाजवणारा स्टार खेळाडू विनोद कांबळीचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ बघून अवघं क्रिकेटविश्व हादरून गेलं होतं. कांबळीला चालताही येत नव्हतं. इतकंच काय तर त्याला धड एकाच जागी उभंही राहता येत नव्हतं. पण खरंच त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

कांबळीच्या मित्रांनीच दिली महत्वाची अपडेट

विनोद कांबळीला धड चालताही येत नसल्याचे त्या व्हिडिओत दिसत होते. इतकेच काय तर त्याला एका जागी उभंही राहता येत नव्हतं. काही पावलं चालल्यानंतर त्याला तीन लोकांच्या आधाराची गरज लागली होती. पण आता कांबळीच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. कांबळीच्या जवळच्या मित्रांनी मोठा खुलासा केला आहे. कांबळीची तब्येत आता आधीपेक्षा खूपच चांगली आहे. तो व्हिडिओ जुना आहे, असं त्यांनी सांगितलं.

विनोद कांबळीचा तो व्हिडिओ जुना

विनोद कांबळीचा व्हायरल झालेला व्हिडिओ जुना आहे. त्याची प्रकृती एकदम उत्तम आहे. कांबळीचा शाळेतील वर्गमित्र रिकी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटचे पंच मार्कस यांनी गुरुवारी कांबळीची भेट घेऊन विचारपूस केली.

वर्गमित्रानं नेमकं काय सांगितलं?

विनोद कांबळीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा वर्गमित्र रिकी आणि अन्य एक मित्र आणि पंच मार्कस यांनी त्याची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की, विनोद कांबळीनं आम्हाला सर्व काही सांगितलं. आता मी ठीक आहे. सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका.

हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जेव्हा आम्ही कांबळीची भेट घेतली तेव्हा तो एकदम मजेत होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झालेली आहे. आधीपेक्षा तो उत्तम आहे. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो जुना आहे. आहार योग्य घेत आहे. त्याच्या कुटुंबासोबत तो एन्जॉय करत होता, असं मार्कसने सांगितले.

रिकी-मार्कसला कांबळीनं सांगितल्या जुन्या आठवणी

रिकी आणि मार्कसने गुरुवारी दुपारी जवळपास पाच तास कांबळीसोबत वेळ घालवला. १९९० च्या दशकात वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांना सामोरे गेल्याचा आणि शेन वॉर्नचा सामना करताना खेळलेल्या विस्मरणीय खेळींच्या आठवणींना स्वतः कांबळीनं उजाळा दिला. कांबळीने त्यावेळी काही जुनी गाणी गायली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

SCROLL FOR NEXT