Video: टीम साऊदीच्या षटकाराने प्रेक्षक जखमी Twitter/ @BLACKCAPS
क्रीडा

Video: टीम साऊदीच्या षटकाराने प्रेक्षक जखमी

विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव पाचव्या दिवशी 249 धावांवर संपुष्टात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम (WTC Finals) सामन्यात न्यूझीलंडचा (NZ) पहिला डाव पाचव्या दिवशी 249 धावांवर संपुष्टात आला. किवी संघाने भारतासमोर 32 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. किवी संघाचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीचा (Tim Sauthee) भारतावर आघाडी मिळविण्यात मोठा हात आहे. साऊथीने शानदार फलंदाजी केली आणि 46 चेंडूंत 30 धावा केल्या. सौदी जेव्हा क्रीजवर होते तेव्हा असे वाटत होते की कीवीज भारताविरुद्ध 50 धावांची आघाडी घेण्यास यशस्वी होऊ शकतील. पण जडेजाने साऊदीला बाद करत त्याची खेळी संपवली. सौदीने त्याच्या खेळीदरम्यान 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला. (Video Audience injured by Team Sauthee's six)

सौदीच्या षटकाराने प्रेक्षक जखमी

टीम सौदीने आपल्या शानदार डावात 2 षटकार ठोकले, त्यापैकी एक षटकार प्रेक्षकांमध्ये भिरकावला. तो मारलेला चेंडू थेट चाहत्याच्या डोळ्याला लागला आणि त्या प्रेक्षकाला दुखापत झाली. न्यूझीलंडच्या डावाच्या 100 व्या षटकात, साऊदीने जडेजाच्या पहिल्या चेंडूवर एक शानदार षटकार ठोकला. त्यामध्ये माणसाचा गाल आणि डोळा लाल झाला आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने सांगीतले दुखापत जास्त गंभीर नसून तो स्थिर आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने रोहित शर्मा आणि शुभमन गिलला भारताच्या दुसर्‍या डावात बाद केले. फलंदाजाला बाद करताच त्याने आपल्या नावावर खास विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा सौदी न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. आज या ऐतिहासिक कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस आहे. हा कसोटी सामना अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT