Venkatesh Prasad Share MS Dhoni Bike Collection Video Saam TV
Sports

MS Dhoni Bike Collection: अरे हे गॅरेज आहे की शोरूम! धोनीचं बाईक कलेक्शन पाहून दिग्गज क्रिकेटर अवाक्

MS Dhoni Bike Collection Video: धोनीचे गॅरेज पाहून व्यंकटेश प्रसाद भारावून गेले. त्यांनी अरे हे गॅरेज आहे की शोरूम असं म्हणत त्यांनी धोनीच्या छंदाचे कौतुक केले.

Satish Daud

Venkatesh Prasad Share MS Dhoni Bike Collection Video: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने भारतीय सैन्यदलात लेफ्टनन कर्नल पदाची धुरा सांभाळत कर्तव्य बजावत आहे. महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) कार आणि बाईकची खूपच आवड आहे. त्याच्या गॅरेजमध्ये एकापेक्षा एक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत.

त्याच्या गॅरेजचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा व्हायरल झाले आहेत. अशातच टीम इंडियाचा (Indian Cricketer) माजी दिग्गज खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी नुकतीच धोनीच्या गॅरेजला भेट दिली. धोनीचे गॅरेज पाहून व्यंकटेश प्रसाद भारावून गेले. त्यांनी अरे हे गॅरेज आहे की शोरूम असं म्हणत त्यांनी धोनीच्या छंदाचे कौतुक केले.

इतकंच नाही, तर व्यंकटेश प्रसाद यांनी या गॅरेजचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, "मी एका व्यक्तीमध्ये पाहिलेली कमालीची क्रेझ. महेंद्रसिंग धोनीकडे अप्रतिम बाईक कलेक्शन आहे आणि तो स्वत: एक अविश्वसनीय व्यक्ती आहे. त्याच्या रांचीच्या घरी बाईक आणि कारच्या संग्रहाची ही एक झलक. माणूस आणि त्याची आवड पाहून भारावून गेलो".

दरम्यान, व्यंकटेश प्रसाद यांनी शेअर केलेला व्हिडीओ धोनीची पत्नी साक्षीने रेकॉर्ड केला आहे. यासोबत साक्षीने व्यंकटेश यांना काही प्रश्न देखील विचारले आहेत. सुरुवातीला, रांचीत आल्यानंतर तुम्हाला कसे वाटते? असा प्रश्न साक्षी विचारते. त्यावर व्यंकटेश प्रसाद यांनी “अद्भुत! असं उत्तर दिलं.

पुढे ते म्हणाले, रांचीमध्ये माझी पहिली वेळ नाही. ही माझी चौथी वेळ आहे, पण हे ठिकाण (एमएस धोनीचे बाईक कलेक्शन) वेडे आहे. तुमच्याकडे इतक्या बाईक असू शकत नाहीत, जोपर्यंत कोणीतरी त्याबद्दल वेडा होत नाही. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनीचे बाईक आणि कारचे कलेक्शन पाहता येईल. त्याच्याकडे विंटेजपासून अनेक आलिशान वाहने आहेत, असं व्यंकटेश या व्हिडीओत सांगताना दिसून येत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT