team india saam tv
Sports

IND vs WI: 'IPL सुरु झाल्यानंतर एकही वर्ल्डकप..', टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू भडकले

Venkatesh Prasad: माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी भारतीय संघावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Venkatesh Prasad On Team India: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

यासह वेस्टइंडीज संघाने या मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी भारतीय संघावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार वेस्टइंडीजमध्ये रंगणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी सरावाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. मात्र या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हा तोच वेस्टइंडीज संघ आहे जो २०२२ टी-२० वर्ल्डकप आणि २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरण्यास अपयशी ठरला आहे. ही कामगिरी पाहता वेंकटेश प्रसाद यांनी भारतीय संघाच्या वर्ल्डकपसाठीच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वेंकटेश प्रसाद यांनी ट्विट करत टिम मॅनेजमेंटवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, कसोटी क्रिकेट वगळलं तर उर्वरित २ फॉरमॅटमध्ये भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका गमावली. गेल्या २ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत निराशाजनक कामगिरी. आपण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखं आक्रमक क्रिकेट खेळण्यात अपयशी ठरतोय. (Latest sports updates)

तसेच त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, 'खुप सामान्य कामगिरी केली आहे. २००७ च्या टी-२० वर्ल्डकपनंतर आयपीएल स्पर्धेची सुरूवात झाली होती.त्यानंतर ७ स्पर्धा होऊन गेल्या आहेत, आपण एकही स्पर्धा जिंकू शकलो नाहीये. केवळ एकदाच आपण अंतिम सामन्यात प्रवेश करू शकलो आहे. जिंकण्याची भूक वाढायला हवी. दुसऱ्या टी-२० सामन्यात युजवेंद्र चहलने १६ व्या षटकात २ गडी बाद केले होते. इथुन भारतीय संघाने जिंकायला हवं होतं.'

'चहलने भारतीय संघाला कमबॅक करून दिले. ते चहलचे तिसरे षटक होते आणि वेस्टइंडीजचे ८ विकेट्स गेले होते. त्यानंतर त्याला गोलंदाजी दिली गेली नाही. वेस्टइंडीजच्या ९ व्या आणि १० व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी फलंदाजी करून संघाला सामना जिंकून दिला.'असं वेंकटेश प्रसाद यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : - राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंडल यात्रा जालन्यात दाखल

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT