Prithvi Shaw Nidhi Tapdia  Saamtv
Sports

Prithvi Shaw: काय सांगता! पृथ्वी शॉने गुपचूप उरकले लग्न? Valentine Day ने उलघडले मोठे गुपित

Valentine Day निमित्त ठेवलेल्या स्टोरीने पृथ्वी शॉचे गुपित उलघडले आहे. शॉने ही स्टोरी तात्काळ डिलीट केली मात्र तोपर्यंत ती बरीच व्हायरल झाली होती.

Gangappa Pujari

Prithvi Shaw: पृथ्वी शॉ हा भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू म्हणून ओळखला जातो. सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. ही चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे पृथ्वी शॉने लग्न केल्याचे बोलले जात आहे.

खुद्द पृथ्वी शॉ ने याबद्दलची स्टोरी इंस्टाग्रामवर ठेवल्याने ही माहिती समोर आली आहे. पृथ्वीने व्हॅलेंटाईन डे निमित्त एक स्टोरी ठेवली होती. ज्यामुळे या संपूर्ण घटनेचा खुलासा झाला. शॉने ही स्टोरी तात्काळ डिलीट केली मात्र तोपर्यंत ती बरीच व्हायरल झाली होती. काय आहे पृथ्वी शॉच्या लग्नाचे गुपित, चला जाणून घेवू.. (Valentine Day)

आज जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईनचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेकजण आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देताना दिसत आहेत. पृथ्वी शॉनेही त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे.

तसेच त्यासोबत ‘हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे माय वायफी’ (माझ्या बायकोला व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा), असा कॅप्शनही दिला होता. परंतु काही वेळाने त्याने त्याची ही इन्स्टा स्टोरी डिलीट केली. मात्र तोपर्यंत ही स्टोरी जोरदार व्हायरल झाली. ज्यामुळे पृथ्वी शॉने गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

पृथ्वी शॉने ही स्टोरी टाकली होती, ज्यामध्ये त्याने निधी तापडियाला टॅग केले होते. निधीसोबत त्याने लग्न केलं असल्याचं बोललं जात आहे. निधी ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. अलिकडेच निधीसोबत फिरतानाचे पृथ्वीचे फोटोही व्हायरल झाले होते. पृथ्वीच्या या इंस्टाग्राम स्टोरीने त्याच्या लग्नाचे बिंग फुटले असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे.

महत्वाचे म्हणजे पृथ्वीने (Prithvi Shaw) या फोटोसोबत निधीचा बायको असा उल्लेख केल्याने त्याने खरोखर लग्न उरकले की काय अशा चर्चा आता सर्वत्र पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT