Vaibhav Suryavanshi  saam Tv
Sports

Vaibhav Suryvanshi: वय, उंची, वजन, जात...; वैभव सूर्यवंशीबाबतच्या प्रत्येक गोष्टींचा इंटरनेटवर सर्च, वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं

Vaibhav Suryavanshi height, age, caste: उंची किती, त्याची जात काय? वय काय? वैभव सूर्यवंशीबाबतची सर्वच गोष्टींचा शोध नेटकरी इंटरनेटवर घेत आहे.

Bharat Jadhav

राजस्थान रॉयल्सच्या संघाचा खेळाडू असलेला सर्वात लहान वैभव सूर्यवंशीची चर्चा सर्वत्र होतेय. आयपीएल २०२५ च्या एका सामन्यात ३५ चेंडूत शतक झळकावल्यानंतर वैभव सूर्यवंशी चर्चेत आलाय. लोक त्याच्याविषयी सर्वच गोष्टी जाणून घेत आहेत. त्यात मग त्याचे वय किती, जात काय, आई-वडील कोण आदी गोष्टींचा सर्च इंटरनेटवर केला जातोय. तुम्ही वैभवविषयी काही माहिती जाणून घेणार असाल तर? ही बातमी अखेरपर्यंत वाचा त्यात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सनं १.१ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या विरुद्धच्या सामन्यात वैभवनं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतरच्या सामन्यात वैभवनं मात्र कमाल करत आयपीएलमध्ये नवा इतिहास बनवला. हा विक्रम ना धोनी, रोहित आणि ना विराट कोहलीला करता आलाय.

वैभव सूर्यवंशींने सर्वात कमी चेंडूत शतक करणारा खेळाडू बनलाय. त्यानंतर पूर्व असो पश्चिम किंवा दक्षिण असो उत्तर सर्वत्र एकच चर्चा होते, ती म्हणजे कोण आहे वैभव सूर्यवंशी. इंटरनेटवर नेटकरी वैभवबाबत सर्वच गोष्टींचा शोध घेतला जात आहे. गुगल किंवा इतर सर्च प्लॅटफॉर्मवर लोक वैभव सूर्यवंशीची जात, त्याचे वजन, उंची, जन्मतारीख आणि त्याचे कुटुंब याबद्दल शोधत आहेत. लोक इंटरनेटवर शोधत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देत आहोत.

या गोष्टींचा होतोय सर्च

वैभव सूर्यवंशी डोमेस्टिक टीम कोणती (Domestic team?)

वैभव हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहार क्रिकेट संघाकडून खेळतो. डावखुऱ्या फलंदाजाने जानेवारी २०२४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे.

वैभव सूर्यवंशीचं वय काय? (How old is Vaibhav Suryavanshi?)

वैभव सूर्यवंशीचा जन्म २७ मार्च २०११ ला झालाय. त्याचे जन्मगाव - मोतीपूर. मोतीपूर हे गाव बिहार राज्यातील मिथिला परिसरातील समस्तीपूर जिल्ह्यात असलेल्या ताजपूर तालुक्यात आहे.

आई-वडिलांचं नाव काय ?

इंटरनेटवर त्याच्या आई-वडिलांच्या नावाची कोणतीच माहिती उपलब्ध नाहीये. परंतु वैभवच्या वडिलांना क्रिकेट या खेळाची आवड आहे.

उंची, वय आणि वजन काय?

वैभवचं वय १४ वर्षांचे आहे पण त्याची उंची जास्त आहे. वैभवची उंची ५ फूट ८ इंच आहे. त्याचे वजन सुमारे ५० किलो आहे.

जात काय? Vaibhav Suryavanshi Caste

वैभवची जात सूर्यवंशी आहेत, जे एक राजपूत राजवंश आहे. ज्याचा उगम भगवान सूर्यापासून झाला असे मानले जाते.

वैभव सूर्यवंशीचा क्रिकेटमधील कामगिरी

वैभवने ५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळलेल्या १० डावांमध्ये फक्त १०० धावा केल्यात. त्याने ६ लिस्ट ए सामन्यांमध्ये १३२ धावा केल्यात. यात त्याची सर्वोच्च खेळी ७१ धावांची होती. त्याने ४ टी-२० सामन्यांमध्ये एकूण १६४ धावा केल्या आहेत. वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये तीन सामने खेळले आहेत. यात त्याने १५१ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२५मध्ये गुजरातविरुद्धच्या सामन्यात खेळताना वैभवने केवळ ३८ चेंडूत १०१ धावा बनवल्या होत्या. वैभव टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक आणि शतक करणारा खेळाडू बनलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT