Vaibhav Suryavanshi Creates History! Fastest List A Double Century In 52 Balls 
Sports

28 षटकार, 7 चौकार, बेबी बॉसचं अवघ्या 52 चेंडूत द्विशतक; रोहित, गिलला जे जमलं नाही ते वैभवनं केलं!

Vaibhav Suryavanshi Double Century : वैभव सूर्यवंशी आता लिस्ट-ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात जलद फलंदाज ठरलाय. संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या सामन्यात वैभवने अवघ्या ५२ चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केलं.

Bharat Jadhav

ACC मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ मध्ये भारत 'अ' (India A) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात सामना झाला. दोहा येथील 'युनिव्हर्सिटी ऑफ दोहा फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी' क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बेबी बॉस वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला.

'बेबी बॉस' वैभव सूर्यवंशीने इंडिया 'ए' (India A) साठी अवघ्या 52 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केलं. हे 'लिस्ट ए' (List A) क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद द्विशतक ठरलंय. वैभवने एकूण 53 चेंडूंमध्ये २०४ धावा केल्या, ज्यामध्ये 28 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. व्यावसायिक क्रिकेट सामन्यात एका फलंदाजाने मारलेल्या षटकारांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक

52 वैभव सूर्यवंशी, भारत अ वि यूएई, 2026

103 चाड बोवेस, कँटरबरी वि ओटागो, क्राइस्टचर्च, 2024

114 एन जगदीसन, तामिळनाडू वि अरुणाचल, बेंगळुरू, 2022

114 हॅरी ब्रूक, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, रावळपिंडी, 2026

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विक्रोळीत संतापजनक प्रकार! घरात घुसून १३ वर्षीय मुलीची छेडछाड

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अजय बारस्कररांनी पोलिसांना सोपवला जरांगेंच्या विरोधातील पुराव्याचा पेनड्राईव्ह

Remove Tea Stains: कपड्यांवर चहा-कॉफीचे डाग पडले? डाग घालवण्यासाठी वापरा 'ही' सोपी घरगुती ट्रिक

सुप्रिया सुळेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद, दुसऱ्या खासदाराला राज्यमंत्रीपद; शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याचा प्रस्ताव, घडामोडींना वेग

PM Awas Yojana : पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार

SCROLL FOR NEXT