DAVID WARNER saam tv
Sports

ENG vs AUS: Lords च्या मैदानावर वातावरण तापलं! वॉर्नर,ख्वाजावर MCC च्या सदस्यांनी चढवला हल्ला; पाहा VIDEO

Ashes 2023: पडद्यामागे आणखी काही गोष्टी घडल्या. ज्या समोर आल्या नाहीत. सामना झाल्यानंतर मैदानाबाहेर नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Ankush Dhavre

David Warner Usman Khawaja Fight With MCC Members: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात बऱ्याच गोष्टी होत्या ज्या चर्चेच्या विषय ठरल्या. जॉनी बेअरस्टोचा विकेट, बेन स्टोक्सची झुंझार खेळी, मिचेल स्टार्कने टाकलेला भन्नाट चेंडू, या गोष्टींमुळे सामन्याचा रोमांच वाढला.

मात्र पडद्यामागे आणखी काही गोष्टी घडल्या. ज्या समोर आल्या नाहीत. सामना झाल्यानंतर मैदानाबाहेर नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, सामना झाल्यानंतर जेव्हा खेळाडू ड्रेसिंग रुमच्या दिशेने जात होते. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा आणि एमसीसीचे काही सदस्य आमने सामने आले होते. हा वाद इतका पेटला होता की, संरक्षकांना मध्ये यावं लागलं होतं. एमसीसीने या घटनेची दखल घेत माफी मागीतली आहे. तसेच कठोर कारवाई करत ३ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

सामन्यातील टर्निंग पॉईंट..

या सामन्यातील पाचव्या दिवशी जॉनी बेअरस्टोच्या विकेटचा वाद चांगलाच गाजला. चेंडू डेड होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोने क्रीझ सोडली होती. याच संधीचा फायदा घेत, यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीने थ्रो केला आणि त्याची विकेट घेतली. ऑस्ट्रेलियासाठी ही विकेट चर्चेचा विषय ठरली. (Latest sports updates)

नेमकं काय घडलं?

लंच ब्रेकच्या वेळी ज्यावेळी खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होते, त्यावेळी हा वाद घडला. तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू लॉन्ग रूममधून जात असताना, एमसीसीच्या सदस्यांनी काहीतरी कमेंट पास केली. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा तिथेच थांबले. त्यावेळी ते कमेंट पास करणाऱ्यांना उत्तर देताना दिसून आले.

दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली. उस्मान ख्वाजा डेव्हिड वॉर्नरला समर्थन करताना दिसून आला होता. हा वाद वाढणार इतक्यात इतरांनी मध्यस्ती करत प्रकरण शांत केलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एमसीसीने माफी मागितली असून, ३ सदस्यांना निलंबित केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT