rohit sharma twitter
क्रीडा

Rohit Sharma Viral Video: एक बार जो मैने कमिटमेंट कर दी... रोहित शर्माने बोलून सिक्स मारला,पाहा VIDEO

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या सेमिफायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा धुव्वा उडवत स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेत रोहित शर्माच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

रोहित शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसह स्टम्प माईकवर मजेशीर संवादासाठीही ओळखला जातो. त्याचे स्टम्प माईकवर बोलतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यातही त्याने असं काही म्हटलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव ही जोडी मैदानावर होती. तर लियाम लिविंगस्टन गोलंदाजी करत होता. नुकताच पाऊस पडला होता आणि त्यानंतर इंग्लंडकडून फिरकी गोलंदाज गोलंदाजीला आले. त्यावेळी फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांसाठी अडथळा निर्माण करत होते. मात्र रोहितने फिरकीच्या जाळ्यात न अडकता गोलंदाजाच्या डोक्यावरुन षटकार खेचला.

षटकार मारण्यापूर्वी रोहित काय म्हणाला?

हा षटकार मारण्यापूर्वी रोहित आणि सूर्यकुमार यादव यांच्यात मजेशीर संवाद झाला. ज्यात रोहित म्हणतोय की, 'ऊपर डाले तो देता हूं ना..' रोहितचं सूर्याला आधीच सांगितलं की, याने जर पुढे बॉल टाकला तर मी मोठा फटका खेळणार. लिविंगस्टनने पुढचाच चेंडू पुढे टाकला आणि रोहितने सरळ षटकार खेचला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना रोहितने ३९ चेंडूंचा सामना करत ५७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने १७१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला. यासह ६८ धावांनी हा सामना जिंकत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT