arshdepe singh  saam tv
Sports

Arshdeep Singh Viral Video: 'ओ काका,जेवण द्या ना..', अर्शदीप सिंगचा मजेशीर VIDEO पाहून पोट धरून हसाल

India vs West Indies: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे

Ankush Dhavre

Viral Funny Video: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर मालिकेतील दुसरा सामना ६ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात अर्शदीप सिंग मस्ती करताना दिसून येत आहे.

अर्शदीप सिंगचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल..

अर्शदीप सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय ज्यात अर्शदीप सिंग जेवण मागताना दिसून येत आहे. तर झाले असे की, भारतीय संघातील खेळाडू टीम बसमधून जात असताना युझवेंद्र चहल आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह होता.

त्यावेळी टीम बस मध्ये खेळाडूंची मस्ती सुरू होती. अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई एकाच सीटवर बसले होते. त्यावेळी अर्शदीप सिंगचा म्हणाला की, ' अंकल जी आम्हाला भूक लागली आहे.. जेवण द्या ना... ' अर्शदीप सिंगचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव..

मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावले होते. वेस्टइंडीज संघाने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पदार्पणवीर तिलक वर्माने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले.

तर सूर्यकुमार यादवने २१ आणि कर्णधार हार्दिक पंड्याने १९ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाला या डावात अवघ्या १४५ धावा करता आल्या. हा सामना ४ धावांनी जिंकून वेस्टइंडीज संघाने १-० ची आघाडी घेतली आहे.

या मालिकेतील दुसरा टी-२० सामना ६ ऑगस्ट रोजी गयानातील प्रोविडेंस स्टेडीयमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. यापूर्वी भारतीय संघ शेवटच्या वेळी जेव्हा या मैदानावर खेळण्यासाठी उतरला होता, त्यावेळी भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरूद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT