U19 T20 WC Team India Won Google
Sports

U19 T20 WC: भारतीय महिला संघाकडून बांगलादेशाचा धुव्वा; ८ विकेट राखत टीम इंडियाचा विजय

U19 T20 WC Team India Won: महिलांच्या १९ वर्षाखालील T20 विश्वचषकात भारताचा सामना बांगलादेशाशी झाला. या सामन्यात बांगलादेशला भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Bharat Jadhav

वुमन्स अंडर१९च्या वर्ल्डकपच्या आजच्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशाचा धुव्वा उडवलाय. भारतीय महिला क्रिकेट संघाने ८ विकेट राखत बांगलादेशाला पराभूत केलंय. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशाच्या संघाला भारताच्या महिला संघाने अवघ्या ६५ धावांमध्ये तंबूत परत पाठवलं होतं. बांगलादेशाने दिलेल्या माफक आव्हान भारतीय संघाने ७.१ षटकात पार केलं.

नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशाचा संघाची सुरुवात खराब झाली होती. बांगलादेशाने डगमगत -डगमगत ६४ धावा केल्या. भारतीय संघाच्या खेळाडूंनी कमालीची गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्याला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. भारताकडून गोलंदाजी करताना वैष्णवी शर्माने एकूण ३ विकेट घेतल्या. त्यानंतर शबनम शकील, जेसिथा आणि तृषाने एक एक विकेट घेतली. बांगलादेशाच्या खराब फलंदाजीमुळे भारताने सहरित्या हा सामना जिंकला.

बांगलादेशाने दिलेल्या आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने चांगला खेळ दाखवत हा सामना जिंकला. त्रिशा आणि कमलिनी टीम इंडियासाठी सलामीला आल्या होत्या. कमलिनी ३ धावा करून बाद झाली पण त्रिशा क्रीझने ४० धावा केल्या, ती हबीबा पिंकीच्या चेंडूवर बाद झाली. सानिका चाळके आणि निक्की प्रसाद यांनी शेवटपर्यंत फलंदाजी करत टीम इंडियाला विजयापर्यंत नेले.

भारताने ७.१ षटकात ६५ धावांचे लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडिया उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ पोहोचलीय. भारताचे ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीचे ६ गुण आहेत. अ गटात दोन्ही संघ आता बरोबरीच्या मार्गावर आहेत. श्रीलंकेचा संघ ३ गुण घेऊन तिसऱ्या स्थानी आहे. दरम्यान भारतीय संघाचा एक सामना बाकी आहे. भारत जिंकला तर उपांत्य फेरीत पोहोचेल. जर हरला तर अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. मात्र, भारत उपांत्य फेरीत पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT