Twitter reacts over empty stands in world cup opening match eng vs nz at narendra modi cricket stadium  twitter
Sports

World Cup 2023 Stadiums: सव्वा लाख आसनक्षमता असलेलं स्टेडियम पहिल्याच सामन्यात अख्ख रिकामं; BCCI ट्रोल

Empty Stands In ENG vs NZ Match: पहिल्याच सामन्यात स्टेडियम रिकामं असल्याचं दिसून आलं आहे.

Ankush Dhavre

Empty Stands In ENG vs NZ Match:

जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धेला म्हणजेच वनडे वर्ल्डकपला आजपासून सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यादरम्यान स्टेडियम खचा खच भरलेले असतील.

मात्र असं काहीच झालं नाही. पहिल्याच सामन्यात स्टेडियम रिकामं असल्याचं दिसून आलं आहे. यावरुन नेटकऱ्यांनी BCCI ला ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठीचे ऑनलाईन विक्रीसाठी काढण्यात आले होते. मात्र साईट क्रॅश झाल्याने क्रिकेटप्रेमींना तिकीट मिळू शकलं नाही. तसेच साईट सुरळीत झाल्यानंतर तिकीट सोल्ड आऊट असं दिसून आलं. मात्र ओपनिंग सामन्याच्या दिवशी बुक माय शोने तिकीट विक्रीसाठी काढल्याचं दिसून आलं आहे.

इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानूसार, भारतीय जनता पक्षाने ओपनिंग सामना पाहण्यासाठी ३०,००० ते ४०,००० महिलांना आंमत्रण दिलं आहे. त्या महिला हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावू शकतात.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार,'या महिलांना तिकीट्स देण्यात आले आहेत .आमच्या स्वंयसेवकांना नावं पाठवण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

'या महिला स्टेडियममध्ये आल्या नसल्याने स्टँड्स रिकामे दिसत असावे. दरम्यान रिकाम्या स्टँड्सचा फोटो सोशल मीडियावर होताच नेटकऱ्यांनी BCCI ची फिरकी घ्यायला सुरूवात केली आहे. (Latest sports updates)

एका युजरने नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरील २ फोटो शेअर केले आहेत. एका फोटो आयपीएल २०२३ स्पर्धेदरम्यानचा आहे. ज्यात रोशनाई आणि प्रेक्षकांनी भरलेलं स्टेडियम दिसून येत आहे.

तर दुसरीकडे ओपनिंग सामन्यावेळी रिकामं असलेलं नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम दिसून येत आहे. तर दुसऱ्या एका युजरने स्टेडियमचा फोटो शेअर करत, 'जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये १०० पेक्षाही कमी लोकं'असं कॅप्शन दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT