rohit sharma wicket Twitter
Sports

WATCH Rohit Sharma Wicket : तुषार देशपांडेचा चेंडू गोळीसारखा आला अन् रोहितच्या दांड्या उडवून गेला, पाहा VIDEO

Tushar Deshpande Bowling : मुंबई इंडियन्स संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला आहे.

Ankush Dhavre

MI VS CSK Rohit Sharma Wicket: आयपीएल २०२३ स्पर्धेतील १२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची जोडी मैदानावर आली होती. दोघांमध्ये ३९ धावांची भागीदारी झाली. मात्र रोहित शर्मा अवघ्या २१ धावा करत माघारी परतला.

चेन्नई सुपर किंग्ज संघातील वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे मागच्या सामन्यात जास्त धावा दिल्यामुळे ट्रोल झाला होता. आता त्यानेच कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. चौथ्या षटकात त्याने रोहित शर्माला त्रिफळाचित करत माघारी धाडले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग 11 :

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

चेन्नई सुपर किंग्ज: डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT