team india twitter/bcci
Sports

IND vs BAN: पंत - हार्दिकची फटकेबाजी,अर्शदीप - शिवमची शानदार गोलंदाजी; सराव सामन्यात कोण ठरलं सुपरहिट?

India vs Bangladesh, Practice Match Highlights: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याचा थरार पार पडला.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील शेवटचा सराव सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात बलाढ्य भारतीय संघाने बांगलादेश वर ६० धावांनी विजय मिळवला.या सामन्यात भारतीय संघाकडून हार्दिक पंड्या, रिषभ पंत, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग यांनी शानदार कामगिरी केली.

सराव सामन्यात भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी?

या सामन्यासाठी विराट कोहलीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. तर रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल नव्हे तर संजू सॅमसन डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही. तो ६ चेंडूंचा सामना करून १ धाव करत माघारी परतला. तर कर्णधार रोहित शर्माने १९ चेंडूंचा सामना करत २३ धावा चोपल्या आणि सूर्यकुमार यादवने १८ चेंडूंचा सामना करत ३१ धावा केल्या.

हार्दिक पंड्या -

आयपीएल २०२४ स्पर्धेत फ्लॉप ठरला असला तरीदेखील भारतीय संघासाठी खेळताना त्याने दमदार कमबॅक केलं आहे. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने २३ चेंडूंचा सामना करत १७३.९१ च्या स्ट्राईक रेटने ४० धावा केल्या. यासह गोलंदाजी करताना विकेट्सही काढून दिल्या.

रिषभ पंत:

दुसऱ्याच षटकात संजू सॅमसन बाद झाल्यानंतर रिषभ पंत फलंदाजी करण्यासाठी आला होता. या सामन्यात त्याने ३२ चेंडूंचा सामना करत १६५.६२ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले.

शिवम दुबे-

या सराव सामन्यात शिवम दुबेला फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. फलंदाजी करताना त्याने १६ चेंडूंचा सामना करत १४ धावांची खेळी केली. यासह गोलंदाजी करताना त्याने १३ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या.

अर्शदीप सिंग -

अर्शदीप सिंगने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने ३ षटकात १२ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत पुन्हा नोंदणी सुरू होणार? सरकारकडे केली मागणी, काय निर्णय होणार?

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

Hair Growth Tips: आजपासून जेवणात हे पदार्थ खा, मुळापासून होईल केसांची वाढ

Jamner Crime : घरगुती वाद टोकाला; पतीकडून भयंकर कृत्य, पत्नीचा मृत्यू

Heavy Rain Update : सोलापूरमध्ये पावसाचा हाहाकार! सीना-भीमा नद्यांना पूर, शेती पाण्याखाली; बळीराजावर अस्मानी संकट, पाहा ड्रोन VIDEO

SCROLL FOR NEXT