Tokyo Olympics 2020: उद्या सुरु होणार महासंग्राम; इथे पाहू शकता LIVE Saam Tv
क्रीडा

Tokyo Olympics 2020: उद्या सुरु होणार महासंग्राम; इथे पाहू शकता LIVE

टोकियो ऑलिम्पिकचे (Tokyo Olympics 2020) थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर (DD Sports) होणार आहे आणि ऑल इंडिया रेडिओ (AIR) विशेष कार्यक्रम प्रसारित करणार आहे.

वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिकचे (Tokyo Olympics 2020) थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर (DD Sports) होणार आहे आणि ऑल इंडिया रेडिओ (AIR) विशेष कार्यक्रम प्रसारित करणार आहे. २३ जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिक सुरू होणार आहे. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ आणि स्पोर्ट्स चॅनल डीडी स्पोर्ट्स या माध्यमातून प्रसार भारतीने तुम्हाला आणलेल्या ऑलिम्पिक २०२० चे मेगा कव्हरेज दाखवेल ”असे माहिती व प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) बुधवारी सांगितले. हे प्रसारण ऑलिम्पिकच्या सुरवातीपासून ते संपेपर्यंत केले जाणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक टेलिव्हिजन चॅनेल, रेडियो आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

“ऑलिम्पिकमधील विविध क्रीडा स्पर्धा दररोज पहाटे ५ ते सायंकाळी ७ या वेळेत डीडी स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केल्या जातील,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर “डीडी स्पोर्ट्स आणि एआयआर स्पोर्ट्स ट्विटर हँडल्सवर दररोज या विषयाचे तपशील उपलब्ध करुण दिले जातील”. मंत्रालयाने म्हटले आहे की डीडी स्पोर्ट्स चार तासांहून अधिक चर्चेवर आधारित शो निर्माण करेल, ज्यात खेळातील व्यक्तिमत्त्व टोकियो ऑलिम्पिकचे अग्रदूत म्हणून "चीअर फॉर इंडिया" मोहिमेला हातभार लावला जाणार आहे. मंत्रालयाने सांगितले की हा विशेष कार्यक्रम २२ जुलै आणि २३ जुलै रोजी डीडी स्पोर्ट्सवर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत थेट प्रसारित केला जाणार आहे.

“दररोज, वेगवेगळ्या विषयांसह वेगवेगळे सत्रं असतील. २२ जुलै रोजी हे दोन सत्र एकाच दिवशी संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत आणि दुसर्‍या दिवशी २३ जुलै रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत डीडी स्पोर्ट्सवर पुन्हा प्रर्दशीत होणार आहेत. भारतात ऑलिम्पिक तुम्ही Youtube चॅनेल, DTH आणि NewsonAir या मोबाईल अॅपवर पाहू शकता असे मंत्रालयाने सांगितले आहे. पुढे सांगितले आकाशवाणी स्टेशन 23 ऑक्टोबरपासून त्यांच्या श्रोत्यांसाठी दररोज क्रीडा हायलाइट प्रसारित करतील, एफएम रेनबो नेटवर्क 24 जुलैपासून वेळेवर अपडेट देईल. मंत्रालयाने म्हटले आहे की, “जेव्हा जेव्हा भारत पदक जिंकेल तेव्हा एफएम वाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूजदेखील प्रसारित केली जाईल”.

सर्व आकाशवाणी कॅपिटल स्टेशन्स, एफएम रेनबो नेटवर्क, डीआरएम आणि सार्वजनिक प्रसारकांवरील अन्य रेडिओ स्टेशन्स देखील निवडक हॉकी आणि बॅडमिंटन सामन्यांवरील "ऑफ ट्यूब" कॅामेंट्री प्रसारित करेल असेही मंत्रालयाने सांगितले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: प्रथमेश परब आणि शशांक शेंडेचा 'श्री गणेशा' लवकरच; चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Maharashtra News Live Updates: छत्तीसगडमध्ये चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

IND vs SA: भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यात पडला रेकॉर्ड्सचा पाऊस; संजू- तिलकने मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड्स

Escalator In Marathi: एस्कलेटरला मराठीत काय म्हणतात?

Shocking Video: पर्यटकांच्या बसमध्ये जाण्यासाठी बिबट्याची खिडकीवर झेप, पुढे काय झालं ते पाहाच

SCROLL FOR NEXT