भारतीय हॅाकी संघाची विजयी घोडदौड सुरुच; उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश Twitter/ @FIH_Hockey
Sports

भारतीय हॅाकी संघाची विजयी घोडदौड सुरुच; उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकही गोल करण्यात कोणत्याही संघाला यश आलं नाही.

वृत्तसंस्था

भारतीय पुरुष हॉकी (Indian Hockey Team) संघाने गुरुवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनावर 3-1 असा विजय मिळवून ऑलिम्पिकच्या उपांत्यपुर्व फेरित प्रवेश केला आहे. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकही गोल करण्यात कोणत्याही संघाला यश आलं नाही. त्यानंतर भारताने 43 व्या मिनिटाला पहिला गोल करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

अर्जेटिनाने आपला एकमेव गोल शुथ कॅसेल्लाच्या मदतिने केला. हा गोल 48 व्या मिनिटाला पेनल्टीच्या स्वरुपात करण्यात आला. भारत या विजयासह ग्रुप अ मध्ये ऑस्ट्रेलियानंतर दुसरा क्रमांकावर आहे. भारतीय हॅाकी संघाने या ऑलिम्पिकमध्ये आपला तिसरा विजय नोंदवला आहे, तर एका सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे.

अर्जेटिना सहा संघांच्या पूलमध्ये पाचव्या स्थानावर झगडत आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी शुक्रवारी अंतिम प्राथमिक सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करणे आवश्यक आहे. अव्वल- चार संघ प्रत्येक गटातून अंतिम आठमध्ये प्रवेश करतील. शुक्रवारी भारत आपला अंतिम पूल सामना यजमान जपानशी खेळेणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT