Tokyo Olympics: घोडेस्वार फौद मिर्झाचा अंतिम फेरीत प्रवेश Twitter
Sports

Tokyo Olympics: घोडेस्वार फौद मिर्झाचा अंतिम फेरीत प्रवेश

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) घोडेस्वारी जंपिंग इवेंटमध्ये (Equestrian event) खेळणारा भारताचा घोडेस्वार फौद मिर्झाने (Fouaad Mirza) शानदार कामगिरी केली आहे.

वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) घोडेस्वारी जंपिंग इवेंटमध्ये (Equestrian event) खेळणारा भारताचा घोडेस्वार फौद मिर्झाने (Fouaad Mirza) शानदार कामगिरी केली आहे. मिर्झाने 47.20 असा मजबूत स्कोर करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. फौद मिर्झाने पदक जिंकतो का याकडे लक्ष लागून आहे. फवादने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन विषेश उपलब्धी प्राप्त केली आहे. मिर्झा मागच्या 20 वर्षातला पहिला असा घोडेस्वार आहे. जो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे.

भारतीय खेळाडू कमलप्रीत कौर सोमवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये डिस्कस थ्रोमध्ये पदक जिंकण्याच्या तयारीत आहे. कमलप्रीत भारताला ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक मिळवून देण्यापासून काही पावले दूर उभी आहे. तिने 2 ऑगस्टला शनिवारी डिस्कस 64 मीटर दूर फेकून अंतिम फेरी गाठली होती.

भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी टोकियो ऑलिम्पिक क्वॉर्टर फायनलमध्ये क्वार्टर फायनलमध्ये क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत करून प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला. तत्पूर्वी, भारताच्या पुरुष संघाने ग्रेट ब्रिटनला त्यांच्या उपांत्यपूर्व सामन्यात 3-1 ने पराभूत करून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवून 41 वर्षांतील पहिले पदक जिंकण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT