PV Sindhu चा उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश; भारतासाठी पदक आणनार? Twitter/ @ANI
Sports

PV Sindhu चा उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश; भारतासाठी पदक आणनार?

डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डला (Mia Blichfeldt) पराभूत करत गुरुवारी अखेरच्या आठमध्ये प्रवेश केला आहे.

वृत्तसंस्था

टोकियो: रिओ ऑलिम्पिक (Rio Olympics) रौप्यपदक विजेती आणि विश्वविजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) महिला एकेरी बॅडमिंटन (Badminton Single) स्पर्धेच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डला (Mia Blichfeldt) पराभूत करत गुरुवारी अखेरच्या आठमध्ये प्रवेश केला आहे.

सिंधूने मुसाहिनो फॉरेस्ट स्पोर्ट्स प्लाझा येथे 41 मिनीट चाललेल्या सामन्यात मियाचा 21-15, 21-13 असा पराभव केला आहे. जगातीक क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या बॅडमिंटनपटूचा सिंधूने सहज पराभव केला. सहा सामन्यांमधील सिंधूचा हा पाचवा विजय आहे. यावर्षी थायलंड ओपनमध्ये भारतीय खेळाडूला मियाविरुद्धच्या एकमेव पराभवाला सामोरे जावे लागले होते.

बुधवारी मुशॅशिनो फॉरेस्ट प्लाझा कोर्ट 3 येथे टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेदरलँडच्या मार्क कॅलजावविरुद्धच्या भारतीय शटलर साई प्रणीथ पराभूत झाला. कॅलजावने या सामन्यात प्रणीथचा 21-14, 21-14 असा पराभव केला. या पराभवामुळे प्रणीथ पुढच्या टप्प्यात पात्र ठरला नाही कारण त्याने दोन्ही गटातील दोन्ही सामने गमावले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT