sushila devi likmabam, vijay kumar yadav, harjinder kaur, common wealth games 2022, judo, weightlifting, India at common wealth games 2022, barmingham Saam Tv
Sports

CWG22 : सुशिला देवी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौरला उज्जवल यश; नऊ पदकांसह भारत सहाव्या स्थानावर

एकूण नऊ पदकांपैकी भारताच्या वेटलिफ्टिर्सनी सात पदकं प्राप्त केली आहेत.

Siddharth Latkar

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम (barmingham) येथे सुरु असलेल्या काॅमनवेल्थ गेम्समध्ये (common wealth games 2022) आजपर्यंत भारताने (india) एकूण नऊ पदकं (medal) जिंकली आहे. या स्पर्धेतील चाैथ्या दिवशी भारताच्या चमूनं तीन पदकांची कमाई केली. देशाच्या वेटलिफ्टरनी (weightlifting) स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. तर दूसरीकडे ज्युदाेत (judo) देशास दाेन पदकं मिळाली आहेत. (India At Common wealth games marathi news)

वेटलिफ्टर हरजिंदर कौर (harjinder kaur) हिने 71 किलो वजनीगटात देशास कांस्य पदक पटकाविलं. हरजिंदरने एकूण 212 किलो वजन उचलले. यात स्नॅच प्रकारात 93 किलो तसेच क्लीन अँड जर्क प्रकारात 119 किलो वजन उचलले.

खरं तर हरजिंदर चौथ्या स्थानावर राहणार असं वाटत असतानाच अंतिम क्षणी नायजेरियन वेटलिफ्टरला क्लीन अँड जर्कचा अखरेच्या प्रयत्नात यश आले नाही. त्याचा फायदा हरजिंदरला झाला.

वेटलिफ्टरच्या यशाबराेबरच देशाच्या ज्युदाेपटूंनी देखील पदक तालिकेत भर टाकली. यामध्ये 48 किलो महिला वजनी गटात सुशिला देवी (sushila devi likmabam) हिने रौप्य पदकाची कमाई केली.

ज्यूदोत पुरूषांच्या 60 किलो वजन गटात विजय कुमार यादवने (vijay kumar yadav) याने देशास कांस्य पदक मिळवून दिले. त्यामुळे वेटलिफ्टरं बराेबरच ज्युदाे खेळाडूंनी देखील भारताची शान काॅमनवेल्थ गेम्समध्ये उंचावली आहे.

या स्पर्धेत भारताने नऊ पदकं जिंकून पदक तालिकेत सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. आजही भारतीय खेळाडू विविध क्रीडा प्रकारात आपली काैशल्य सिद्ध करणार आहेत. त्यामुळे निश्चितच देशाच्या पदक संख्येत वाढ हाेईल असा विश्वास क्रीडाप्रेमींना वाटत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT