rinku singh and tilak varma saam tv
Sports

Rinku Singh Vs Tilak Verma: तिलक वर्मापेक्षा रिंकू सिंग ठरला सुपरहिट, तरीही संघात स्थान न मिळण्याचं कारण काय?

Rinku Singh Record: मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू तिलक वर्माची या मालिकेसाठी निवड केली गेली आहे.

Ankush Dhavre

IND VS WI T20I Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने( बीसीसीआयने) वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.

या मालिकेसाठी आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे. मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू तिलक वर्माची या मालिकेसाठी निवड केली गेली आहे.

तर दुसरीकडे रिंकू सिंगला डावललं गेलं आहे. तिलक वर्माला स्थान मिळालं मग रिंकू सिंगला का नाही? काय आहे कारण? जाणून घ्या.

रिंकू सिंग आणि तिलक वर्मा यांनी आपल्या संघासाठी दमदार कामगिरी केली. रिंकू सिंगने गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात सलग ५ चेंडूंमध्ये ५ षटकार मारले होते. तसेच अनेकदा त्याने पराभूत होत असलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र बीसीसीआयने या कामगिरीची दखल घेतली नाही.

तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघासाठी मध्यक्रमात महत्वाची खेळी करणाऱ्या तिलक वर्माला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. (Latest sports updates)

रिंकू सिंग आणि तिलक वर्माची आयपीएल २०२३ कामगिरी..

आयपीएल २०२३ स्पर्धेत रिंकू सिंग आक्रमक फलंदाजी करताना दिसून आला होता. त्याला सर्व सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेतील १४ सामन्यांमध्ये ५९.०५ च्या सरासरीने ४७४ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ अर्धशतके झळकावली होती.

तर ६७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तर तिलक वर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी खेळताना ११ सामन्यांमध्ये ४२.८८ च्या सरासरीने ३४३ धावा केल्या. या दोघांची आयपीएल २०२३ स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर रिंकू सिंग पुढे आहे.

तिलक वर्माला स्थान मिळण्याचं कारण काय?

भारतीय संघाला एका अशा फलंदाजाची गरज होती, जो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकेल. त्यासाठी तिलक वर्मा हा परफेक्ट चॉईस आहे. तो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, हे त्याने आयपीएल स्पर्धेत दाखवून दिलं आहे.

त्याने चौथ्या क्रमांकावर १० वेळेस, पाचव्या क्रमांकावर ११ वेळेस, तिसऱ्या क्रमांकावर २ वेळेस आणि सहाव्या क्रमांकावर २ वेळेस फलंदाजी करण्यासाठी आला आहे. हेच कारण आहे की,तिलक वर्माला वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या संघात स्थान दिलं गेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

SCROLL FOR NEXT