Retired Hurt Retired Out Difference x
Sports

Retired Out म्हणजे नक्की काय? तिलक वर्मा रिटायर्ट आउट की रिटायर्ट हर्ट झाला होता? काय आहे फरक?

Retired Hurt Retired Out Difference : लखनऊ विरुद्ध मुंबई सामन्यात रिटायर्ड आउट झाल्याने तिलक वर्मा चर्चेचा विषय बनला आहे. पण एखादा खेळाडू रिटायर्ड आउट झाला म्हणजे नक्की काय झालं? रिटायर्ट आउट आणि रिटायर्ट हर्टमध्ये काय फरक आहे? वाचा

Yash Shirke

Tilak Varma Retired Out : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाला होता. त्याच्या जागी मिचेल सँटनर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. तिलकला दुखापत झाली नव्हती, तो फलंदाजी करण्यास सक्षम होता. तरीही त्याला रिटायर्ड आउट यानुसार डगआउटमध्ये पाठवण्यात आले होते. पण रिटायर्ड आउट म्हणजे नक्की काय? रिटायर्ड आउट आणि रिटायर्ड हर्टमध्ये नेमका फरक काय? चला जाणून घेऊयात..

रिटायर्ड आउट म्हणजे काय?

फलंदाजी करत असलेल्या खेळाडूला मागे बोलावून त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला मैदानात पाठवण्यासाठी रिटायर्ड आउट या नियमाचा वापर केला जातो. हा निर्णय संघाकडून घेतला जातो. त्यात अंपायर्सची परवानगी घेण्याची गरज नसते. रिटायर्ड आउट झालेला खेळाडू पुन्हा त्या सामन्यात फलंदाजी करु शकत नाही. ज्या वेळेस मैदानात खेळत असलेला फलंदाज फॉर्ममध्ये नसला आणि त्याच्याकडून आवश्यक खेळ होत नसला, तर त्याला रिटायर्ड आउट नियम वापरुन डगआउटमध्ये बोलावले जाते.

रिटायर्ड हर्ट म्हणजे काय?

मैदानामध्ये खेळत असताना दुखापत होण्याची शक्यता असते. खेळाडूला दुखापत झाल्यास जर खेळाडूला मैदानाबाहेर जायचे असेल, तर त्याला रिटायर्ड हर्ट नियमानुसार बाहेर पाठवले जाते. रिटायर्ड हर्ट असताना डगआउटमध्ये जाण्यासाठी अंपायर्सची परवानगी घेण्याची गरज असते. खेळाडू जर खेळण्यासाठी फिट असेल, तर तो पुन्हा फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये परतू शकतो.

रिटायर्ड आउट आणि रिटायर्ड हर्टमधील फरक -

१. रिटायर्ड आउटनुसार, विकेट पडली नसली किंवा दुखापत झाली नसली तरीही फलंदाजाला मैदानाबाहेर जाता येते. रिटायर्ड हर्टनुसार, दुखापत झाल्यास खेळताना त्रास होत असल्यास मैदानाबाहेर जाता येते.

२. रिटायर्ड आउट असलेला खेळाडू सामन्यात पुन्हा फलंदाजी करु शकत नाही. रिटायर्ड हर्ट झालेला खेळाडू सामन्यामध्ये पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT