tilak varma to captain india a squad vaibhav suryavanshi gets chance saam tv
Sports

India A squad : तिलक वर्मा कर्णधार, वैभव सूर्यवंशीला संधी; वनडे मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा

vaibhav suryavanshi selected in india a squad : श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी निवड समितीनं भारत अ संघाची घोषणा केली. तिलक वर्मा भारतीय संघाचा कर्णधार असेल. तर वैभव सूर्यवंशीला संघात संधी देण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

आयपीएल २०२६ मध्ये अवघ्या ११ डावांत एक शतक, दोन अर्धशतके आणि ४० षटकारांसह ४०० हून अधिक धावा कुटणारा वैभव सूर्यवंशी हा आता भारतीय क्रिकेट संघाच्या निळ्या जर्सीत खेळताना पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने श्रीलंकेत होणाऱ्या वनडे तिरंगी मालिकेसाठी घोषित केलेल्या भारत अ संघात त्याला संधी दिली आहे. (BCCI has announced the India A squad for the ODI tri series in Sri Lanka) तर तिलक वर्मा याच्याकडे नेतृत्व सोपवलं आहे.

बीसीसीआयनं गुरुवारी श्रीलंकेत होणाऱ्या वनडे तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने जून २०२६ मध्ये होणाऱ्या या मालिकेसाठी भारत अ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी तिलक वर्माकडे दिली आहे. (tilak varma to captain india a squad) या मालिकेत यजमान श्रीलंका अ संघ आणि अफगाणिस्तान अ संघांचा सहभाग असणार आहे.

मर्यादित षटकांच्या या तिरंगी मालिकेत श्रीलंका अ, अफगाणिस्तान अ आणि भारत अ संघ सहभागी होणार आहेत. या मालिकेनंतर भारत अ आणि श्रीलंका अ या दोन संघांमध्ये मल्टी-डे सामना होईल. या सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा नंतर केली जाणार आहे. मालिकेतील सर्व वनडे सामने हे दाम्बुला येथे खेळवले जातील. तर मल्टी-डे सामना गाल येथे खेळवण्यात येईल.

प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन यांनाही स्थान

आयपीएल २०२६ मध्ये अनेक युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यात पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग यांनी आपल्या फलंदाजीनं सगळ्यांनाच प्रभावित केलं आहे. भारत अ संघात या दोघांनाही संधी देण्यात आली आहे. याशिवाय अंशुल कम्बोज, यश ठाकूर आणि विपराज निगम, आयुष बडोनी आणि हर्ष दुबे यांचाही संघात समावेश आहे.

तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघ पुढीलप्रमाणे -

तिलक वर्मा, प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग, आयुष बडोनी, निशांत सिंधु, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्र, विपराज निगम, यश ठाकूर, युद्धवीर सिंग, अंशुल कम्बोज, अरशद खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे?

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! १० तोळा ७,७०० रुपयांनी वाढले; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर वाचा

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT