आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा संपल्यानंतर आता सर्वांच लक्ष आयपीएल २०२५ स्पर्धेवर लागून आहे. ही स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले. क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत. तर काही असेल देखील खेळाडू आहेत, जे आपल्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा हंगाम खेळताना दिसून येऊ शकतात. कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या.
एमएस धोनी :
यावर्षी निवृत्ती जाहीर करणाऱ्या यादीतील सर्वात मोठं नाव म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी. चेन्नई सुपर किंग्ज संघाला ५ वेळेस आयपीएलची ट्रॉफी जिंकून देणारा एमएस धोनी यावर्षी या स्पर्धेला रामराम करू शकतो. त्याचं वय पाहता हे त्याचं शेवटचं हंगाम असू शकतं.
ईशांत शर्मा
ईशांत शर्मा हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. ईशांत शर्माकडे हैदराबाद, पुणे, पंजाब आणि दिल्ली संघासाठी खेळण्याचा अनुभव आहे. मात्र आगामी हंगामात तो गुजरातकडून खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान हे हंगाम त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचं हंगाम असू शकतं.
फाफ डू प्लेसिस
फाफ डू प्लेसिस गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. मात्र या हंगामात तो दिल्लीकडून खेळताना दिसून येणार आहे. त्याची फलंदाजी अजूनही आक्रमक आहे. पण त्याचं वय पाहता तो हे हंगाम झाल्यानंतर निवृत्ती जाहीर करू शकतो.
करण शर्मा
करण शर्मा ३७ वर्षांचा आहे. २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याला मुंबई इंडियन्स संघाने ५० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलंय. आतापर्यंत त्याने ८४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३५० धावा करत ७६ गडी बाद केले आहेत.
मोईन अली
इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अली आपला शेवटचा आयपीएल हंगाम खेळताना दिसून येऊ शकतो. ३७ वर्षीय मोईन अली या स्पर्धेतील पाचवा सर्वात वयस्कर खेळाडू असेल. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला २ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलंय. त्याचं देखील हे शेवटचं हंगाम असू शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.