indian cricket team  saam tv
Sports

Team India News: या ३ खेळाडूंना संघात स्थान तर मिळालं, पण प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण

ICC T20 World Cup 2024: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी १५ खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे. दरम्यान ३ खेळाडूंना संघात स्थान मिळणं कठीण आहे.

Ankush Dhavre

आगामी टी -२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा थरार अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंड विरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर बहुप्रतिक्षित भारत पाकिस्तान सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तर ४ राखीव खेळाडूंना संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान आम्ही तुम्हाला ३ अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना या स्पर्धेत बाकावर बसून राहावं लागेल.

संजू सॅमसन

भारतीय संघाच्या स्टार फलंदाज संजू सॅमसन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने आपल्या संघाला प्लेऑफपर्यंत पोहचवलं. यासह फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं. मात्र या स्पर्धेसाठी रिषभ पंतलाही भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. रिषभ पंत मध्यक्रमात फलंदाजी करताना मोठे फटके खेळू शकतो. त्यामुळे रोहित शर्मा संजू सॅमसनऐवजी रिषभ पंतला संधी देऊ शकतो.

अक्षर पटेल

भारतीय संघाचा डावखुरा अष्टपैलू गोलंदाज अक्षर पटेललाही संपूर्ण स्पर्धेत बाकावर बसून राहावं लागेल. कारण या स्पर्धेसाठी रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे अक्षर पटेलला संधी मिळणं जरा कठीणच आहे. अक्षर पटेल आपल्या फिरकी गोलंदाजीसह आक्रमक फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. मात्र रविंद्र जडेजा संघात असताना अक्षर पटेलला संघात स्थान मिळवण्यासाठी वाट पाहावी लागेल.

युजवेंद्र चहल

भारतीय संघाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी वाट पाहावी लागेल. कारण रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचं संघातील स्थान जवळजवळ निश्चित आहे. रोहित शर्मा ३ फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देईल हे जरा कठीण आहे. युजवेंद्र चहल हा भारतीय संघाकडून टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. मात्र जडेजा आणि कुलदीप यादव असताना त्याला आपल्या संधीची वाट पाहावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

Maharashtra News Live Update: सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांचे उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या

Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

Konkan Forts : समुद्राच्या लाटांपासून जंगलाच्या कुशीत, कोकणातील 'हे' ५ किल्ले आहेत खूपच खास

LPG Cylinder : शहरी आणि ग्रामीण भागातल्या LPG ग्राहकांना दुसरा गॅस सिलिंडर कधी बुक करता येणार? नवीन अपडेट समोर

SCROLL FOR NEXT