FIFA World Cup
FIFA World Cup Saam Tv
क्रीडा | IPL

FIFA World Cup : आतापर्यंत दोनदा चोरीला गेली फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी; 'असा' झाला उलघडा

Shivani Tichkule

FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कपचा (FIFA World Cup) ब्लॉकबस्टर अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लुसेल स्टेडियम झाला. फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही तगड्या संघाच्या खेळाडूंनी जोरदार खेळ दाखवला. मात्र, मेस्सीच्या अर्जेंटिनाने चार पावले पुढे टाकत फ्रान्सला धूळ चारली. हा रंगतदार फिफा वर्ल्ड कप २०२२चा अंतिम सामना जिंकत अर्जेंटिनाने मोठा इतिहास रचला. परंतु विश्वचषकाच्या ८८ वर्षांच्या इतिहासात ही ट्रॉफी किती वेळा चोरीला गेली, हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊया...

जगातील सर्वात लोकप्रिय ट्रॉफींपैकी एक म्हणजे फिफाची ट्रॉफी. ही ट्रॉफी खेळाडूंसोबतच चोरांमध्येही खूप लोकप्रिय आहे. त्यामुळेच फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी आतापर्यंत दोन वेळा चोरीला गेली आहे. पहिल्यांदा 1966 फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी चोरला गेली होती.

लंडनमधील वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ही ट्रॉफी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. तेथून ही ट्रॉफी चोरीला गेली होती. जेवणाच्या वेळी चोरट्यांनी मागील दाराने हॉलमध्ये प्रवेश केला आणि ट्रॉफी चोरून नेली. स्पर्धा सुरू होण्याच्या ३ महिने आधी ट्रॉफी चोरीला गेली होती. या घटनेनंतर लंडनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अनेक दिवस ट्रॉफीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती कोणताही पुरावा लागला नाही.

त्यानंतर काही दिवसांनी लंडनच्या साऊथ नॉर्वूड परिसरात एक व्यक्ती हे त्यांचा पाळीव श्वान पिकल्सला फिरायला घेऊन गेले असता पिकल्स एका गाडीजवळ फिरू लागला. जेव्हा पिकल्स याचे मालक त्या गाडी जवळ गेले असता त्यांना पेपरमध्ये गुंडाळलेले काही सामान दिसले. त्यांनी पेपर काढला असता त्यांना वर्ल्ड कप ट्रॉफी दिसली.

त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांकडून त्यांची बराच वेळ चौकशी करण्यात आली.चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. मग काही वेळातच पिकल्स नावाच्या श्वानाला ट्रॉफी सापडल्याची बातमी पसरली. यानंतर श्वान आणि त्याच्या मालकाचा सन्मान करण्यात आला आणि पिकल्स जगभर प्रसिद्ध झाला.

दुसऱ्यांदा 1983 मध्ये ट्रॉफी चोरी

तर 1983 मध्ये दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप ट्रॉफी चोरला गेली होती. आजच्याच दिवशी म्हणजेच 19 डिसेंबर 1983 रोजी ही घटना घडली. त्यावेळी फिफा विश्वचषक ट्रॉफी ज्युल्स रिमे ट्रॉफी या नावाने ओळखली जात होती. आजच्या दिवशी ब्राझीलची राजधानी रिओ-डी-जनेरियो येथे ज्युल्स रिमे ट्रॉफी चोरीला गेली. ब्राझिलियन फुटबॉल असोसिएशनच्या मुख्यालयात बुलेटप्रूफ काचेच्या शो केसमध्ये ही ट्रॉफी ठेवण्यात आली होती. मात्र, चोरट्यांनी मोठ्या शिताफीनं ट्रॉफी चोरली. चोरीला गेलेली ट्रॉफी पुन्हा कधीच मिळाली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्येतीमुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT