smith saam tv
Sports

Ind Vs Aus: बॉल स्टंपला लागला पण स्मिथ आऊट झालाच नाही; पाहा नेमकं काय घडलं? Video

Ind Vs Aus: कांगारूंचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ बोल्ड होता होता थोडक्यात वाचला आहे. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलचा सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी सुरु आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना एक घटना घडली. यामध्ये कांगारूंचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ बोल्ड होता होता थोडक्यात वाचला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

थोडक्यात वाचला स्मिथ

रोहित शर्माने अक्षर पटेलला ओव्हर दिली होती. यावेळी अक्षरचा बॉल स्मिथच्या बॅटला लागला आणि मागील बाजूस गेला. हा बॉल जमिनीवर लागून हलकासा स्टंप्सना लागला मात्र बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळे लकी स्मिथ अगदी थोडक्यात वाचला. १३ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ही घटना घडली.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी हातावर बांधली काळी पट्टी

भारतीय संघाने सामन्यात भारताचे माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काळी पट्टी बांधली आहे. सोमवारी पद्माकर शिवलकर यांचे निधन झालं. ८४ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शिवलकर हे फिरकीपटू होते. १९६१-६२ पासून १९८७-८८ पर्यंत १२४ प्रथम श्रेणीतील सामने त्यांनी मुंबईकडून खेळले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT