महाराष्ट्राची कन्या तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने सन्मानीत Saam TV
Sports

महाराष्ट्राची कन्या तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने सन्मानीत

ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पहात होतो. अखेर तो अभिमानास्पद क्षण येऊन ठेपलाच.

वृत्तसंस्था

सातारा : ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पहात होतो. अखेर तो अभिमानास्पद क्षण येऊन ठेपलाच. प्रियांका मंगेश मोहिते Priyanka Mangesh Mohite ही महाराष्ट्राची शिखरकन्या. भारत सरकार मार्फत दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च म्हणता येईल असा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार २०२१ जाहीर झाला. हा पुरसकर सन १९९३ पासून जमीन, पाणी, पर्वत आणि आकाशातील अदम्य साहसांकरीता विशेषत्वाने सुरु करण्यात आला आहे.

प्रियांकाला गिर्यारोहण या प्रचंड साहसी क्रीडाप्रकारातील सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरींसाठी जाहिर झाला आहे. हा अत्त्युच्च पुरस्कार प्रियांकाचा गुणगौरव तर आहेच त्याचबरोबर प्रियांकाच्या पर्वतीय साहसाला कारणीभूत ठरलेला गिरीदुर्गराज सह्याद्री, मराठी माणसातील प्रखर जिद्द आणि साहस तसेच ललामभूत महाराष्ट्राचाही अभिमान आहे. गिर्यारोहणातील विशेष उल्लेखनिय कामगिरीकरीता महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा शिवछत्रपती क्रीडापुरस्कार २०१९ साली मिळाला आहे.

जगातील १४ अष्टहजारी हिमशिखरांपैकी ४ हिमशिखरांवर निर्विवाद आणि निर्भेळ यश मिळवणारी प्रियांका ही पहिली महाराष्ट्रीय महिला गिर्यारोहक म्हणून जगभरात सुविख्यात आहे. इतकेच नाही तर जगातील सर्वोच्च अशा माऊंटएव्हरेस्ट वर वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी मिळवलेल्या तगड्या यशानंतर, जगातील ४थे अत्त्युच्च ल्होत्से (८,५१६ मीटर), ५वेअत्त्युच्च मकालू (८,४६३ मीटर) आणि २०२१ मध्ये तर अत्यंत भयावह असे १०वे अत्त्युच्च अन्नपुर्णा (८,०९१ मीटर) या हिमशिखरांवर यशस्वीरीत्या चढाई केलेली देखील ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली. त्यामुळेच तीच्या उदंड साहसाचा सन्मानपूर्ण गुणगौरव या पुरस्कारामुळे झालेला आहे.

अगदी शालेय जीवनापासूनच प्रियांकाने गिर्यारोहणाच्या अनगड, अवघड साहसवाटांवर केलेली वाटचाल इतकी शास्त्रशुद्ध आणि शिस्तबद्ध आहे की या क्षेत्रातील परिश्रम आणि सातत्यपूर्ण यशाचे ती मुर्तीमंत उदाहरण होऊन बसली आहे. गिर्यारोहणातील एक कणखर युथ आयकाॅन म्हणून तीच्या नांवाचा दरारा होताच. या पुरस्कारामुळे तर त्यावर अधिकृत राजमान्यता आणि लोकमान्यतेचे शिक्कामोर्तबच झाले आहे. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्लीत एका सोहळ्यात प्रियांकास हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

Maharashtra Rain Live News : - भर पावसात कृषिमंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर

Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

Loksabha: मुख्यमंत्री असो पंतप्रधान खुर्ची जाणारच; लोकसभेत सादर होणार विधेयक काय आहे, काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT