Team India T20 Saam
Sports

Team India T20 Series:टीम इंडिया पहिल्यांदाच 'या' देशात खेळणार टी-२० मालिका; BCCIकडून वेळापत्रक जाहीर

T20 series Team India vs Bangladesh: टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात बांगलादेशचा दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.

Bharat Jadhav

तुम्ही क्रिकेटचे चाहते आहात? क्रिकेट तुमचा जीव की प्राण आहे? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आयपीएलचा धमाक्यानंतर टीम इंडिया टी२० मालिका खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करणार आहे. त्यामुळे टी २० क्रिकेटचा आनंद तुम्ही असाच घेऊ शकणार आहात. आयपीएल झाल्यानंतर टीम इंडिया बांगलादेशचा दौरा करणार आहे.

आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघा इंग्लंडचा दौरा करणार आहे. तेथे दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामने खेळले जातील. यानंतर भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडियाचा हा दौरा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत तर शेवटचा सामना ३१ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाची ही पहिली व्हाईट बॉल मालिका असणार आहे. तसेच टीम इंडियाची बांगलादेशमधील ही पहिली टी-२० मालिका देखील असणार आहे.

बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

बांगलादेश दौऱ्यावर टीम इंडियाला आधी ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना १७ ऑगस्ट रोजी मीरपूर येथे खेळला जाईल. यानंतर दुसरा एकदिवशीय सामनाही तेथेच खेळला जाईल. तर सीरिजमधील तिसरा सामना २३ ऑगस्ट महिन्याच्या चट्टोग्राममध्ये खेळला जाणार आहे.

एकदिवसीय मालिकेनंतर, भारत आणि बांगलादेशात ३ सामन्यांची टी-२० मालिका देखील खेळली जाणार आहे. टी-२० मालिका २६ ऑगस्ट रोजी चट्टोग्राममध्ये सुरू होईल. टी-२० मालिकेतील दुसरा सामना २९ ऑगस्ट रोजी आणि तिसरा सामना ३१ ऑगस्ट रोजी मीरपूर येथे खेळला जाईल.

भारत आणि बांगलादेश यांच्यात ६ सामने

पहिला एकदिवसीय सामना – १७ ऑगस्ट (मिरपूर)

दुसरा एकदिवसीय सामना – २० ऑगस्ट (मिरपूर)

तिसरी वनडे - २३ ऑगस्ट (चट्टोग्राम)

पहिला टी२० सामना – २६ ऑगस्ट (चट्टोग्राम)

दुसरा टी२० सामना – २९ ऑगस्ट (मिरपूर)

तिसरा टी२० सामना – ३१ ऑगस्ट (मिरपूर)

२०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही तीन सामन्यांची मालिका खूपच रोमांचक असणार आहे. या मालिकेपासून अधिक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची तयारी सुरू होणार आहे. टी-२० विश्वचषकाची स्पर्धेच यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे असणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. दरम्यान भारतीय संघाने गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून विजेतेपद पटकावले होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: राज्यातील डाळिंबाच्या बागा टार्गेट? पुण्यातील शेतातून तब्बल ४.५ हजार किलो डाळिंब चोरीला, सोलापुरातही तशीच घटना

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे मयत गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांच्या आज भेट घेणार

Scholarship Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, 'या' दिवशी होणार पेपर

ठाकरे गटाच्या खासदाराला 100 कोटींसह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, माजी आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

Tilachi Chutney Recipe : हिवाळ्यात खायलाच पाहिजे, तिळाची पौष्टिक आणि चवदार चटणी!

SCROLL FOR NEXT