Ind vs pak Saam tv
Sports

Asia cup 2025: फायनलआधी राडा! फोटो काढायला सूर्या ब्रिगेडचा नकार, पाकिस्तानचा कर्णधार म्हणतो....

India refuses final photoshoot Pakistan: आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) च्या भारत-पाकिस्तान अंतिम (IND vs PAK Final) सामन्यापूर्वी क्रिकेटच्या मैदानाबाहेर पुन्हा एकदा 'हाय-व्होल्टेज' नाट्य पाहायला मिळाले.

Surabhi Jayashree Jagdish

शनिवारी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने आशिया कपच्या फायनलपूर्वी झालेल्या फोटोशूट वादावर आपली भूमिका मांडली. अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही कर्णधारांचं एकत्र फोटोशूट आयोजित करण्यात आलं होतं. मात्र टीम इंडियाने या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला. 

फोटोशूट ऐवजी भारतीय खेळाडूंनी एक दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि टीमच्या कोणत्याही सदस्याने माध्यमांसमोर हजेरी लावली नाही. त्यामुळे फायनलपूर्वी पत्रकार परिषद घेण्याची जुनी परंपराही यावेळी मोडली गेली.

यावेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने माध्यमांसमोर उभं राहत या विषयावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं. सूर्यकुमार यादवच्या फोटोशूटमधील गैरहजेरीबाबच विचारल्यावर तो हसत म्हणाला, “सर, त्यांची इच्छा आहे ते काय करतात. आम्ही प्रोटोकॉल पाळणार आहोत. बाकी त्यांना यायचं असेल तर यावं, नसेल तर येऊ नये, ही त्यांची मर्जी.”

खेळाडूंच्या भावना व्यक्त करण्यावर बंदी योग्य नाही

आगाने पत्रकारांशी बोलताना सध्या सुरू असलेल्या वादांवरही भाष्य केलं. तो म्हणाला की, “प्रत्येक व्यक्तीला आपली भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर आपण वेगवान गोलंदाजांना भावना दाखवण्यापासून रोखलं, तर मग काय उपयोग आहे? जोपर्यंत एखादी गोष्ट अपमानजनक होत नाही, तोपर्यंत मी माझ्या खेळाडूंना रोखणार नाही.”

मागील भारत-पाकिस्तान सामन्यात हारिस रऊफच्या आक्रमक हावभावांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तरीही आगा यांनी आपल्या गोलंदाजांच्या आक्रमकतेला पाठिंबा दिला आणि ती त्यांच्या खेळाचा एक भाग असल्याचं स्पष्ट केलं.

हँडशेक प्रकरणावरही प्रतिक्रिया

भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये सध्या निर्माण झालेल्या वातावरणाबाबत आगा म्हणाला की, हँडशेक न करण्याची घटना घडायला नको होती.  तो म्हणाला, “मी 2007 मध्ये अंडर-16 क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून आजवर मी असं कधीच पाहिलं नाही की कोणतीही टीम सामना संपल्यानंतर हात मिळवत नाही. भारत-पाकिस्तान संबंध ताणलेले असतानाही आम्ही नेहमी हँडशेक केला आहे.”

फायनलमध्ये पीसीबी अध्यक्षांची उपस्थिती वाद वाढवू शकते

आशिया क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी हे फायनल सामन्यास उपस्थित राहून विजेत्या टीमकडे ट्रॅाफी दिली जाणार आहे.  भारताच्या ‘नो हँडशेक’ भूमिकेमुळे त्यांची उपस्थिती आणखी वाद निर्माण करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा गोळीबार प्रकरण; पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली

Navi Mumbai Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ५२७ कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाच्या तारखा

Maharashtra Politics: मोर्चात ठाकरेंची बडवा-बडवीची भाषा, ठाकरेंची एकी, महायुतीला धडकी?

Maharashra News: महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक; पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

SCROLL FOR NEXT