Ind vs AFG टी २० मालिकेआधी संघात मोठा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं आहे.  saam tv
Sports

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

Yash Thakur replaces Harshit Rana in Team India squad : अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या टी २० मालिकेआधी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा दुखापतीमुळं बाहेर झाला आहे. त्याच्या जागी विदर्भाच्या २७ वर्षीय गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं आहे.

Nandkumar Joshi

Yash Thakur selected for Afghanistan T20 series : अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामन्यांची टी २० मालिका होणार आहे. त्याआधीच भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघाबाहेर जावं लागलं आहे. दुखापतीमुळं तो ही मालिका खेळू शकणार नाही. त्याच्या जागी संघात विदर्भ एक्स्प्रेस यश ठाकूरला भारतीय संघात संधी मिळाली आहे.

यश ठाकूर हा महाराष्ट्रातील विदर्भाचा खेळाडू आहे. निवड समितीनं यश ठाकूरला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी २० मालिकेसह २०२६ च्या एशियन गेम्ससाठीही हर्षित राणाऐवजी संघात स्थान दिले आहे. हर्षित बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेन्स येथे रिहॅबिलिटेशनमध्ये असून, तो दुखापतीतून सावरण्यासाठी प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघात हर्षितला संधी देण्यात आली होती. मात्र, ७ सप्टेंबरला मॅच सिम्युलेशनवेळी गोलंदाजी करताना पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी २० मालिकेसह एशियन गेम्समध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या ऐवजी आता यश ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

यश ठाकूरवर भरवसा

हर्षितच्या जागी यश ठाकूरला संधी मिळाली आहे. अलीकडेच भारतीय टी २० संघात त्यानं पदार्पण केले होते. २७ वर्षांच्या यशने जुलैमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतासाठी टी २० संघात पदार्पण केले होते. झिम्बाब्वेच्या विरोधात दोन सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या होत्या. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या होणाऱ्या तीन सामन्यांत त्याला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. यशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ७६ टी २० सामन्यांत ११४ विकेट घेतल्या आहेत.

श्रेयस अय्यरकडं नेतृत्व

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत भारताचं नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. तिलक वर्मा उपकर्णधार असेल. तर संघात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीसारखे विस्फोटक फलंदाज आहेत. संजू सॅमसन, इशान किशन हे दोन युवा फलंदाजही संघात असतील. अष्टपैलू म्हणून शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर अशा तगड्या खेळाडूंचा भरणा देखील आहे. वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई हे फिरकीपटू देखील आपल्या फिरकीवर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना गिरकी घ्यायला लावणार आहेत. तर यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि यश ठाकूर हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहेत.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे

श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, यश ठाकूर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT