team india saam tv
Sports

Asia Cup 2023: ठरलं! तर 'या' दिवशी होणार आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा

Team India Squad For Asia Cup 2023: भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

Team India News: आशिया चषक २०२३ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या ३० ऑगस्टपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

मात्र अजूनही या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली नाही. भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार कळवला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये केले जाणार आहे.

स्पर्धेतील ४ सामने पाकिस्तानात तर ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहे. या स्पर्धेसाठी येत्या सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इन्साइ़ड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार,' केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही ८० टक्के फिट आहेत. परंतु अद्यापही हे दोघे मैदानावर उतरणार नाहीत.

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी आशिया चषक स्पर्धेच्या पार्श्वभुमीवर राहुल द्नविड यांची भेट घेतली आहे. सध्या संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.'

तसेच ते पुढे म्हणाले की, 'आम्हाला अशी आशा आहे की,श्रेएस अय्यर आणि केएल राहुल हे दोघेही वर्ल्डकप पर्यंत फिट होतील. आम्ही त्यांच्या पूनरागमनासाठी घाई करणार नाही. या दोघांना फिट होऊन परतण्यासाठी कमीत कमी ३ आठवडे लागतील.' आशिया कप २०२३ चे सामने लाहोर, मु्ल्तान, कोलंबो आणि कँडी येथे खेळवले जातील. (Latest sports updates)

आगामी आशिया चषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक...

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - ३० ऑगस्ट

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - ३१ ऑगस्ट

भारत विरुद्ध पाकिस्तान - २ सप्टेंबर

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - ३ सप्टेंबर

भारत विरुद्ध नेपाळ - ४ सप्टेंबर

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - ५ सप्टेंबर

सुपर-२४ सामने

अ १ विरुद्ध ब २ - ६ सप्टेंबर

ब १ विरुद्ध ब २ - ९ सप्टेंबर

अ १ विरुद्ध अ २ - १० सप्टेंबर

अ २ विरुद्ध ब १- १२ सप्टेंबर

अ १ विरुद्ध ब १ - १४ सप्टेंबर

अ २ विरुद्ध ब २ - १५ सप्टेंबर

अंतिम सामना - १७ सप्टेंबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT