Rohit Sharma And jasprit Bumrah saam tv
Sports

T20 वर्ल्डकप महत्वाचा आहे, पण....; जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर रोहित शर्माने केलं मोठं विधान

स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळं वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे, पण...

नरेश शेंडे

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात उद्या रविवारपासून टी-20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु होणार आहे. टीम इंडिया वर्ल्डकपसाठी सज्ज झाली असतानाच पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे. भारताचा हुकमी एक्का स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळं वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. बुमराहच्या जागेवर अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी खेळणार असल्याची घोषणा (BCCI) बीसीसीआयने केली आहे.अशातच बुमराहच्या दुखापतीबाबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे. (Rohit Sharma latest press conference update)

रोहित शर्मा म्हणाला....

टी-20 वर्ल्डकप आवश्यक आहे. परंतु, जसप्रीत बुमराहचा करिअर जास्त महत्वाचा आहे. बुमराहने टीम इंडियासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. दुखापत झाल्यावर तुम्हाला काहीच करता येत नाही. आम्ही बुमराहच्या दुखापतीबाबत तज्ज्ञांसोबत चर्चा केलीय. वर्ल्डकप महत्वाचा आहे पण त्याचं करिअर जास्त महत्वाचं आहे. तो 27-28 वर्षांचा आहे.

आम्ही धोका पत्करू शकत नाही. त्याला अजून खूप क्रिकेट खेळायचं आहे. त्याची कमी आम्हाला वर्ल्डकपमध्ये जाणवेल. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं वर्ल्डकपमध्ये खेळणार नसल्याची घोषणा बीसीसीआयने 3 ऑक्टोबरला केली होती. बुमराह ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत उपचार घेत आहे, अशी माहिती रोहित शर्माने शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागेवर रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) बुमराहच्या जागेवर 15 सदस्यांच्या भारतीय संघामध्ये सामील केलं आहे.पाठीच्या दुखापतीमुळं बुमराह टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळणार नाहीय. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार,अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने मोहम्मद शमीला आयसीसी पुरूष टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या जागेवर खेळवण्याची घोषणा केलीय.शमी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरला राखीव खेळाडू म्हणून घोषीत केला आहे.

टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड : रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव,दीपक हुड्डा, रिषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), हार्दिक पंड्या, आर आश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT