team india reached new york  twitter
Sports

T20 World Cup 2024: मिशन टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडिया अमेरिकेत दाखल! बीसीसीआयने शेअर केला Video

Team India Reached New york For T20 World Cup 2024: आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा संघ अमेरिकेत दाखल झाला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. ही स्पर्धा येत्या १ जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी अमेरिकेची वाट धरली आहे. दरम्यान भारतीय संघ मिशन टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला आहे. बीसीसीआयने भारतीय खेळाडू न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये १५ सदस्यीय संघातील १० खेळाडू असल्याचं दिसून येत आहे. तर उर्वरीत ५ खेळाडूंनी आयपीएल प्लेऑफ आणि वैयक्तिक कारणास्तव अमेरिकेला जाणारी फ्लाईट पकडलेली नाही.

बीसीसीआयने या आधीच सांगितलं होतं की, भारतीय खेळाडू २ गटात अमेरिकेला जाणार आहे. अमेरिकेला जाणाऱ्या पहिल्या गटात रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. तर उर्वरीत ५ खेळाडू आणि २ राखीव खेळाडू लवकरच अमेरिकेसाठी रवाना होतील. माध्यमातील वृत्तानुसार, विराट कोहली १ जून रोजी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यात खेळताना दिसून येणार नाहीये.

बीसीसीआयने शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा मुंबईपासून ते न्यूयॉर्कपर्यंतच्या प्रवासाची एक झलक दाखवण्यात आली आहे. रोहित शर्मा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मह सिराज, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे खेळाडू न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. तर विराट कोहली,युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल हे दुसऱ्या गटासोबत वेस्टइंडिजला जाणार आहेत. यासह रिंकू सिंग आणि आवेश खान राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत जाणार आहेत.

टी-२० वर्ल्डकपसाठी असा आहे भारतीय संघ

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT