भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा सामना आज हरारेच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात.
या मालिकेसाठी आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. यापूर्वी शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांना देखील भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र हे खेळाडू बारबाडोसहून उशिरा मायदेशी परतले. त्यामुळे या खेळाडूंना सुरुवातीच्या २ सामन्यांमधून विश्रांती दिली गेली होती. त्यांच्याऐवजी हर्षित राणा, जितेश शर्मा आणि साई सुदर्शन यांना संधी दिली गेली होती. त्यामुळे प्लेइंग ११ मध्ये बदल होऊ शकतात.
या सामन्यासाठी यशस्वी जयस्वालचा भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. त्याला संघात स्थान देण्यासाठी साई सुदर्शनचा पत्ता कट होऊ शकतो. जर या सामन्यात यशस्वी जयस्वाल सलामीला उतरणार असेल, तर कर्णधार शुभमन गील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.
आतापर्यंत सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये ध्रुव जुरेल यष्टिरक्षण करताना दिसून आला आहे. दरम्यान तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी संजू सॅमसन यष्टिरक्षण करताना दिसेल. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन हे नुकतेच टी -२० वर्ल्डकप खेळून मायदेशी परतले आहेत. मात्र त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या प्लेइंग ११ मध्ये तिसरा वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शिवम दुबेचा समावेश केला जाऊ शकतो.
अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, रियान पराग, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.