team india saam tv
Sports

Champions Trophy: रोहित बाहेर, शमीला विश्रांती; IND vs NZ सामन्यात अशी असू शकते भारताची प्लेइंग ११

Team India Playing XI Prediction In IND vs NZ Match: भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात येणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील साखळी फेरीतील शेवटचा सामना रंगणार आहे. रविवारी हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आपलं सेमीफायनलचं स्थान फिक्स केलं आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. या सामन्यात यष्टीरक्षक रिषभ पंतला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. तर कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते.

रोहित शर्माला विश्रांती मिळणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माच्या मांसपेशी खेचल्या गेल्या आहेत. त्यामुळे रोहित शर्मा सराव करण्यासाठी मैदानात येऊ शकला नाही. भारत आणि न्यूझीलंड सामन्याला अजूनही ३ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे रोहितकडे पूर्णपणे फिट होण्यासाठी पुरेसा वेळ आहे. मात्र असं होऊ शकलं नाही, तर सेमीफायनलचा सामना पाहता, रोहितला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून ब्रेक दिला जाऊ शकतो.

रोहित शर्माला ब्रेक दिल्यानंतर रिषभ पंतचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. तर रिषभ पंत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसून येऊ शकतो.

गोलंदाजीक्रम बदलणार?

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला विश्रांती दिली जाऊ शकते. तर त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी दिली जाऊ शकते. तर मोहम्मद शमीला विश्रांती देऊन त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT