IND VS ENG Cricket Match Twitter
Sports

IND vs ENG: शमीला आज तरी संधी मिळणार का? तिसऱ्या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या

Team India Playing XI Prediction: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Saam TV News

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये रंगणार आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली आहे. या विजयासह भारतीय संघाने या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.

आता मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघ या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या मालिकेसाठी मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला संधी देण्यात आलेली नाही. दरम्यान तिसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळणार का? जाणून घ्या.

चेन्नईत झालेल्या दुसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय संघात २ मोठे बदल करण्यात आले होते. वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जूरेलला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले होते. ध्रुव जूरेलला फलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. रिंकू सिंग दुखापतीमुळे या सामन्यातूनही बाहेर होणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू रमनदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते. तर नितीश रेड्डीच्या जागी शिवम दुबेचा समावेश केला जाऊ शकतो.

रमनदीप सिंगला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या संधीचा फायदा घेत त्याने शानदार फलंदाजी केली होती. तर शिवम दुबेला श्रीलंकेत आपला शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली होती. या दोन्ही खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे रवी बिश्नोई किंवा वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग ११ मधून बाहेर बसावं लागेल.

राजकोटमध्ये शमीला संधी मिळणार का?

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संघात स्थान तर दिलं गेलं आहे. मात्र सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. तिसऱ्या सामन्यातही त्याला संधी मिळण्याची शक्यता ही खूप कमी आहे. शमीचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत तो महत्वाची भूमिका बजावू शकतो. मात्र आता त्याचं मैदानावर न उतरणं हे भारतीय फॅन्सचं टेन्शन वाढवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT