virat kohli twitter
Sports

IND vs ENG, Playing XI: टीम इंडियाची प्लेइंग 11 बदलणार; विराट आल्यानंतर कोणाची सुट्टी होणार?

Team India Playing XI Prediction : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतात. दरम्यान कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला.या सामन्यात भारताने इंग्लंडचा एकतर्फी धुव्वा उडवला.

ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी कटकच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतात. कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या.

नागपुरमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात मोठा बदल पाहायला मिळाला होता. संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहलीला गुडघ्याच्या दुखापतीमुळे प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवण्यात आलं होतं. दुसऱ्या वनडेत तो खेळणार हे निश्चित आहे. दरम्यान श्रेयस अय्यरने सामन्यानंतर मोठा खुलासा केला. जर विराट फिट असता तर अय्यरला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले नसते.

कोहली कोणाच्या जागी खेळणार?

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वालला पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र त्याला पदार्पणात हवी तशी कामगिरी करता आली नाही. जयस्वाल रोहित शर्मासह डावाची सुरुवात करताना दिसून आला. तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार होता.

गंभीरचा प्लान पाहिला, तर त्याला लेफ्टी -रायटी कॉम्बिनेशन हवं आहे. पहिल्या वनडेत श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी केली. त्यामुळे रोहित त्याला संघाबाहेर ठेवणार नाही. दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वालला बाहेर ठेवले जाऊ शकते. तर शुभमन गिल आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात.

यासह गोलंदाजी आक्रमणात देखील बदल पाहायला मिळू शकतो. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज म्हणून हर्षित राणाला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. तर दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमीला संधी दिली गेली होती. पण या सामन्यात अर्शदीप सिंगला कमबॅक करण्याची संधी दिली जाऊ शकते.

दुसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर,केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा/अर्शदीप सिंग,मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठी मिडियम' मालिकेतली अभिनेत्री आहे प्रसिद्ध इन्फ्ल्यूएन्सर! इन्स्टाग्रामवर आहेत मिलियन फॉलोअर्स

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला आग

Navi Mumbai Airport: मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास फक्त ५ मिनिटांत, काय आहे सरकारचा मास्टरप्लान?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा, कोणाचे कर्ज होणार माफ?

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' मराठीनंतर हिंदीतही १ नंबरवर! रितेश भाऊंनी रचला इतिहास, कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT