team india playing 11  Saam tv news
क्रीडा

Team India Playing 11 : टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार?; धडाकेबाज फलंदाज, खतरनाक गोलंदाजाची होणार एन्ट्री

India vs Pakistan Playing 11 Prediction: या सामन्याासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

India vs Pakistan Playing 11 Prediction:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर येत्या १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना रंगणार आहे. भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे.

आता पाकिस्तानला पराभूत करून भारतीय संघ या स्पर्धेत विजयाची हॅट्रीक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११.

अहमदाबादची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नेहमी फायदेशीर ठरते. पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यात शुभमन गिल आणि रोहित शर्मा डावाची सुरूवात करताना दिसून येऊ शकतात. गेले काही दिवस डेंग्यूने त्रस्त असलेल्या शुभमन गिलच्या प्रकृतीत आता सुधार झाला असून तो फलंदाजीचा सराव करताना दिसून आला आहे.

शुभमन गिलचं कमबॅक झाल्याने ईशान किशनला प्लेइंग ११ मधून बाहेर राहावं लागेल. तर अनुभवी फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल.

मध्यक्रमात या फलंदाजांना मिळू शकत संधी..

या सामन्यात श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. तर सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. (Latest sports updates)

या गोलंदाजांना मिळणार संधी..

या सामन्यासाठी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला फिरकी गोलंदाज म्हणून संधी मिळणं जवळजवळ निश्चित आहे. तो सध्या जोरदार फॉर्ममध्ये देखील आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते. गेल्या सामन्यात शार्दूल ठाकुरला संधी दिली गेली होती. मात्र त्याला या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११..

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT