team india playing 11 saam tv
Sports

Team India Playing 11: पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग 11; आक्रमक फलंदाजाला राहावं लागेल संघाबाहेर

IND vs WI 1st Test: जाणून घ्या कशी असू शकते या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११.

Ankush Dhavre

Team India Playing 11 For IND vs WI 1st Test: वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ११ निवडणं रोहितसाठी सोपं मुळीच नसेल. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

मालिकेतील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. दरम्यान जाणून घ्या कशी असू शकते या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११.

डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करू शकतात. दोघेही आक्रमक फलंदाज आहेत, त्यामुळे हे दोघेही संघाला आक्रमक सुरुवात करून देऊ शकतात. यशस्वी जयस्वालला संधी मिळाल्यामुळे ऋतुराज गायकवाडला बाहेर बसावं लागू शकतं.

मध्यक्रम...

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी चेतेश्वर पुजाराला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार अजिंक्य रहाणे खेळताना दिसून येऊ शकतो.

विकेटकीपर

पहिल्या कसोटी सामन्यासाठी विकेटकीपर म्हणून ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. तर केएस भरतला विश्रांती दिली जाऊ शकते. केएस भरतला फलंदाजी करताना हवी तशी कामगिरी करता आली नाही. तर ईशान किशन आक्रमक फलंदाज आहे. तो संघासाठी जलद गतीने धावा गोळा करू शकतो.

फिरकी गोलंदाज..

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आर अश्विन आणि रविंद्र जडेजाच्या जोडीला संधी दिली जाऊ शकते. तर अक्षर पटेलला विश्रांती दिली जाऊ शकते.

वेगवान गोलंदाज...

या सामन्यासाठी शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट या वेगवान गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते. तर मुकेश कुमार आणि नवदीप सैनीला संधी मिळण्याची आणखी वाट पाहावी लागणार आहे. (Latest sports updates in marathi)

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११(Team india playing 11 for IND vs WI 1St test)

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

SCROLL FOR NEXT