rohit sharma twitter
Sports

IND vs AUS: 1 ओव्हर,0 रन अन् 2 विकेट; अवघ्या 5 मिनिटात असा फिरला सामना

India vs Australia 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी ३४० धावांची गरज आहे. मात्र या डावातही भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या कसोटीत भारतीय संघाला ३४० धावांचा पाठलाग करायचा आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेली भारतीय जोडी पुन्हा एकदा फ्लॉप ठरली. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली.

भारतीय संघाकडून या धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानात आली. गेल्या काही सामन्यांमध्ये फ्ल्प ठरलेल्या रोहितने या डावात सावध पवित्रा घेत सुरुवात केली.

मात्र रोहित शर्माने त्याचा प्लान फ्लॉप केला. सामन्यातील १७ वे षटक टाकण्यासाठी कमिन्स गोलंदाजीला आला आणि त्याने पुन्हा एकदा रोहितची विकेट मिळवली. या षटकात केवळ रोहित नव्हे तर कमिन्सने केएल राहुलला बाद करत भारतीय संघाला दुहेरी धक्का दिला.

कमिन्सच्या एका षटकाने फिरला सामना

तर झाले असे की, रोहित शर्मा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून १७ वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा बाद होऊन माघारी परतला. कमिन्सने ऑफ साईडच्या दिशेने टाकलेल्या चेंडूवर रोहितने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला.

मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली आणि चेंडू हवेत गेला. त्यावेळी मिचेल मार्शने सोपा झेल घेतला. यासह अवघ्या २५ धावसंख्येवर भारतीय संघाला पहिला धक्का बसला. रोहितने ४० चेंडूंचा सामना करत ९ धावांची खेळी केली.

रोहित बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालची जोडी कमाल करेल असं वाटलं होतं, मात्र ही जोडीही कमिन्सने फोडली. कमिन्सने टाकलेल्या शॉर्ट चेंडूवर राहुल डिफेन्स करायला गेला, मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. उस्मान ख्वाजाने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. अशाप्रकारे कमिन्सने ऑस्ट्रेलियाला एकाच षटकात २ मोठे धक्के दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT