India Vs New Zealand Match Saam Tv
Sports

विजयानंतर भारताला जोरदार धक्का, स्टार खेळाडूला दुखापत, दुसऱ्या T20 सामन्यातून OUT

India Vs New Zealand Match: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का बसला. स्टार खेळाडूला दुखापत झाल्याने तो सामन्यातून बाहेर पडला.

Priya More
  • न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारताला धक्का

  • ईशान किशनला दुखापत झाल्याने तो सामन्यातून बाहेर पडला

  • पहिल्या सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली

  • बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर उपचार सुरू

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला. दुखापत झाल्यामुळे स्फोटक बॅट्समन ईशान किशन टी-२० सामन्यातून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, क्राइस्टचर्च येथे झालेल्या पहिल्या सामान्यादरम्यान ईशानच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे ईशान तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला नाही. त्याच्या जागेवर टिलक वर्माला पाठवण्यात आले. पण तो फक्त सहा धावाच करू शकला. त्यानंतर ईशान पाचव्या क्रमांकावर आला आणि तो फक्त एका धावेवरच बाद झाला.

बीसीसीआयने पुढे असे देखील सांगितले की, ईशान किशन शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी- २० सामन्यातून बाहेर झाला आहे . या मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या मांडीच्या स्नायूला किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे तो दुसऱ्या टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचसोबत टी- २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात मोठा धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम टीम इंडियाने केला. प्रथम बॅटिंग करत न्यूझीलंडने २२५ धावा केल्या. त्यानंतर भारताच्या खेळाडूंनी जबरदस्त बॅटिंग करत हा सामना जिंकला.

या सामन्यात संजू सॅमसनने ६७ धावा केल्या. त्याला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला. तर त्याच्यापाठोपाठ श्रेयस अय्यरने ४२ धावा आणि नमन धीरने ४२ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामाना २४ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजता होणार आहे. या सामन्यात आता दुखापत झाल्यामुळे ईशान किशन खेळणार नाही. आता त्याच्या जागी वैभव सूर्यवंशी खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये कोणकोण?

श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन , वैभव सूर्यवंशी, इशान किशन, टिळक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक कुमार यादव, मयंक कुमार यादव, अरविंद यादव, अरविंद कुमार यादव, कुलदीप यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकण- पुणे मार्गावर ट्रकला आग, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात

Loose Motion: जुलाब झाल्यानंतर कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे? जाणून घ्या

Tiger Shroff : गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफची झाली होती 'अशी' अवस्था, VIDEO पाहून बसेल धक्का

WhatsApp Update : ...तर तुमचंही Whatsapp होणार बंद, तुम्ही तर ही चूक करत नाहीत ना? आताच जाणून घ्या

Car Accident News : महामार्गावर भीषण अपघात! कारचा चक्काचूर,४ मित्रांचा मृत्यू , दोघे जखमी

SCROLL FOR NEXT