team india twitter
Sports

Champions Trophy: 'भारताकडे चॅम्पियन बनण्याची संधी, पण..' माजी खेळाडूने सांगितला विजयाचा फॉर्म्युला

Deepdas Gupta On Team India: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत.

Ankush Dhavre

India vs Australia,Semi Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी जाऊन पोहोचला आहे. याचा अर्थ असा की, ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ ग्रुप बी मध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमी फायनल खेळणार आहे.

आयसीसीच्या नोकआउटमध्ये ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. मात्र यावेळी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाला मात देणार का? याबाबत माजी भारतीय खेळाडूने मोठं वक्तव्य केलं आहे.

भारताचे माजी यष्टिरक्षक फलंदाज दिपदास गुप्ता यांच्या मते, भारतीय संघाच्या खरा आव्हानाला आता सुरुवात झाली आहे. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवलं. त्यानंतर पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडला हरवलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्याबाबत बोलताना दिपदास गुप्ता म्हणाले, ‘आता खऱ्या अर्थाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाकडे सुवर्णसंधी आहे. पण हा मार्ग मुळीच सोपा नसेल. भारताला चॅम्पियन बनायचंय तर समोर कोण आहे याचा विचार करत बसावं लागणार नाही.’

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड?

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ १५१ वेळेस आमनेसामने आले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाने ८४ वेळेस बाजी मारली आहे. तर भारतीय संघाने ५७ सामने जिंकले आहेत. ही आकडेवारी पाहिली, तर हे स्पष्ट होतंय की, ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघावर भारी आहे.

मात्र आयसीसी नॉकआऊट्समध्ये दोन्ही संघांचा रेकॉर्ड बरोबरीत राहिला आहे. दोन्ही संघ ६-६ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ३ तर ऑस्ट्रेलियाने ३ सामने जिंकले आहेत. यावेळी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: जीरा वॉटर की चिया सिड्स? वजन कमी करण्यासाठी कोणता ऑप्शन ठरेल बेस्ट?

New Mumbai- Pune Expressway: गुड न्यूज! मुंबईवरुन पुण्याला पोहचा फक्त ९० मिनिटांत, तयार होतोय नवा ८ पदरी 'एक्स्प्रेस वे'

Face Care: महागड्या फेशियलची काय गरज? घरच्या घरीच 'हा' फेसमास्क लावून मिळवा गुलाबी मुलायम त्वचा

डब्यांवर तेलकट, पिवळे डाग एका मिनिटात होतील गायब! वापरा हे भन्नाट उपाय

Drinking Water Advice: कडक उन्हातून घरी गेल्यावर लगेच घटाघट पाणी पिताय? सावधान! या ४ गोष्टी आताच टाळा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT