u19 Team Viral Dance Video
u19 Team Viral Dance Video Saamtv
क्रीडा | IPL

Team India: आनंद गगनात मावेना! Team India च्या सुपर लेडींचा भन्नाट डान्स; ICC ने शेअर केला Video

Gangappa Pujari

U19 Womens T20 World Cup: महिला अंडर-१९ पहिला विश्वचषक जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. या विश्वचषकचा अंतिम सामना भारत आणि इंग्ंलड संघात पार पडला. सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजेतेपदाचा सामना जिंकला.

ऐतिहासिक विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय अंडर-१९ महिला संघाने मैदानावर जल्लोष केला. त्याचबरोबर काला चष्मा या गाण्यावर डान्स केला. ज्याचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. (Womens Cricket)

सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना इंग्लडचा डाव अवघ्या ६८ धावांत आटोपला. यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने १४ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडला पराभूत करून पहिल्यांदाच चॅम्पियन बनल्यामुळे टीम इंडियान शानदार जल्लोषही केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंग्लडला धुळ चारल्यानंतर भारतीय महिला संघाने जोरदार जल्लोश केला. मैदानात या वेळी त्या काला चष्मा गाण्यावर थिरकताना दिसल्या. त्यांच्या या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ थेट आयसीसीने शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने नेटकऱ्यांना वेड लावले असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. (Viral Video)

दरम्यान, अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. तितस दास साधूने ४ षटकांत ६ धावा देत २ बळी घेतले. याशिवाय अर्चना देवीने २ आणि पार्श्वी चोप्राने २ बळी घेतले.

सोमन यादव, मन्नत कश्यप आणि कर्णधार शफाली वर्मा (Shafali Varma) यांनी १-१ विकेट घेतली. तीत साधूला तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dance Effect on Health : मनसोक्त नाचा! डान्स करण्याचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Top Vegetarian Country: जगातील शाकाहारी लोकांची टक्केवारी आली समोर ; भारताचा क्रमांक कितवा?

Breaking News: बारामती लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत ५.७७ टक्के मतदान

Ajit Pawar : निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना नोटीस, काय आहे प्रकरण?

Social Media मध्ये नेत्यांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ केला पोस्ट, दाेन गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT