IND vs Aus Match Twitter
Sports

IND vs Aus : टीम इंडियाचं कुठे चुकलं? रोहित शर्मा स्पष्टच बोलला

२०९ धावांचं बलाढ्य आव्हान देऊनही भारतीय संघाला पराभवाचा सामना का? करावा लागला असा प्रश्न उपस्थित होतोय.

Satish Daud

IND vs Aus Match : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात तीन सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. बुधवारी मोहालीच्या मैदानावर मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 विकेट्सनी पराभव केला. २०९ धावांचं बलाढ्य आव्हान देऊनही भारतीय संघाला पराभवाचा सामना का? करावा लागला असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने उत्तर दिलंय. (Ind vs Aus Cricket Score)

सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने भारतीय फलंदाजांचं तोंडभरुन कौतुक केलं. पण भारतीय संघाला गोलंदाजीवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं रोहितनं म्हटलं. २०९ हा चांगला स्कोर होता. पण आमच्या बॉलर्सनी आज चांगली कामगिरी केली नाही असं म्हणत रोहित शर्माने पराभवाचं खापर गोलंदाजांवर फोडलं आहे.

सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी जबरदस्त खेळी केली. फलंदाजांच्या सांघिक कामगिरीनंतर भारताने धावांचा मोठा डोंगर उभारला. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २०९ धावांचे आव्हान दिलं . मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धडाकेबाज खेळ दाखवत विजयाला गवसणी घातली. (Ind vs Aus T-20 Match)

ऑस्ट्रेलियाने १९.२ षटकांत ६ बाद २११ धावा करून हा विजय साकारला. आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजानी फटकेबाजीच्या नादात असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिला दणका लवकर दिला. अक्षर पटेलने अ‍ॅरॉन फिंचला बाद केले.

मात्र, भारतीय गोलंदाजांना कॅमेरून ग्रीनला रोखणे जमले नाही. त्याच्या तुफानी हल्ल्यापुढे भारतीय गोलंदाज निष्प्रभ झाले. कॅमेरून ग्रीनने ३० चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६१ धावा केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतले आणखी दोन सामने बाकी असून २३ सप्टेंबरला नागपूरमध्ये तर २५ सप्टेंबरला हैदराबादला तिसरा टी-२० सामना पार पडेल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT